WhatsApp चॅटिंग करण्यापासून अडवलं; पत्नीने पाडले पतीचे दात

WhatsApp
WhatsApp Google
Summary

एका व्यक्तीने तक्रार केली आहे की, त्याची पत्नी फोनवर कोणासबोत चॅटिंग करत होती. त्यावेळी पतीने विचारलं तर पत्नी मोठ्या आवाजात ओरडायला लागली.

व्हॉटसअॅपवर चॅट करण्यापासून रोखल्याच्या रागातून पत्नीने पतीचे दातच तोडल्याची घटना शिमल्यात घडली आहे. पती सतत सोशल मीडियावर पत्नीला चॅटिंग करण्यापासून रोखत होता. याच रागात हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यात पत्नीने पतीला काठीने मारहाण केली. पोलिसात हे प्रकरण गेलं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठियोग ठाण्याच्या क्षेत्रातील छैला इथं हे प्रकरण समोर आलं आहे. पत्नीला सतत थांबवणं पतीला महागात पडलं आहे. पत्नीने पतीला खूप मारहाण केली. यात तिने काठीनेही मारलं आहे. या मारहाणीत पतीचे तीन दात पडले आहेत. गुरुवारी सायंकाळी शिमल्यातील ठियोगमध्ये हा प्रकरार घडला. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वैद्यकीय रिपोर्टच्या आधारे पत्नीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

छैलामधील एका व्यक्तीने तक्रार केली आहे की, त्याची पत्नी फोनवर कोणासबोत चॅटिंग करत होती. त्यावेळी पतीने विचारलं तर पत्नी मोठ्या आवाजात ओरडायला लागली. पत्नीने आपल्याला अडवलं आणि काठीने मारहाणसुद्धा केली.

WhatsApp
माझी हत्या होऊ शकते, सुरक्षा द्या; ओवैसींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

शिमल्याच्या एसपी मोनिका यांनी शुक्रवारी सांगितलं की, आरोपी महिलेविरोधात आयपीसी कलम ३४१, ३२३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यानंतर मारहाण नक्की कोणत्या कारणाने झाली हे समजू शकेल असं त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com