शिरोडकरांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

- काँग्रेसमधील दहा आमदार भाजपमध्ये आल्याने राज्य सरकार अधिक स्थिर आणि भक्कम झाले आहे. याचे प्रतिबिंब राज्याच्या विकासावर पडलेले दिसेल.

- त्यामुळे या राजकीय सर्जिकल स्ट्राईकचे स्वागतच केले पाहिजे असे शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

पणजी : कॉंग्रेंसमधील दहा आमदार भाजपमध्ये आल्याने राज्य सरकार अधिक स्थीर आणि भक्कम झाले आहे. याचे प्रतिबिंब राज्याच्या विकासावर पडलेले दिसेल. त्यामुळे या राजकीय सर्जिकल स्ट्राईकचे स्वागतच केले पाहिजे असे शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी आज सांगितले.

पर्वरी येथील मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आलेल्या शिरोडकर यांना राजकीय घडामोडींविषयी विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. शिरोडकर यांनी कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा पोट निवडणुकीत ते अवध्या सहासष्ठ  मतांनी जिंकले आहेत.

मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल अशीही चर्चा आहे. त्याबाबत ते म्हणाले, "मी कोणतीही मागणी केलेली नाही. मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यावी हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. मी मतदारसंघातील विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठीच आज आलो होतो. मंत्रिमंडळ बदलाबाबत मला माहिती नाही."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirodkar visits chief ministers office