उप्पार मृत्यू प्रकरण: श्रीराम सेना कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

एक नजर

  • गोरक्षक शिवू उप्पार मृत्यू प्रकरणाचा तपास करून न्याय मिळावा, या मागणीसाठी आज श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न
  • सोमवारी (ता.8) क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर घटना
  • रामचंद्र बसप्पा ए. गौडर (वय 18, रा. रायचूर) असे त्याचे नाव.

बेळगाव - गोरक्षक शिवू उप्पार मृत्यू प्रकरणाचा तपास करून न्याय मिळावा, या मागणीसाठी आज श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (ता.8) क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर ही घटना घडली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 

रामचंद्र बसप्पा ए. गौडर (वय 18, रा. रायचूर) असे त्याचे नाव आहे. गोरक्षक शिवू उप्पार याचा खून झाल्याचा संशय आहे. पण, पोलिसांनी त्याने आत्महत्या केल्याची नोंद करून घेतली आहे. असा आरोप करत या प्रकरणाचा तपास करण्यात यावा यासाठी आज श्रीराम सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.

तत्पूर्वी कार्यकर्ते क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर जमले होते. त्यावेळी रायचूर येथील रामचंद्र नामक कार्यकर्त्यांने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे मैदानात काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रामचंद्रची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiu Uppar death case ShriRam Sena activists suicide attempt