शिवसेनेच्या वाघाला ओवेसी विरोधात 112 मतं

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

हैदराबाद: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे शिवसेनेचे नेते सुदर्शन मलकान यांना केवळ 112 मत मिळाली आहेत. ओवेसींविरुद्ध लढणाऱ्या सर्वच 14 विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून ओवेसी यांनी विजय मिळवला आहे. आपल्या वादग्रस्त भाषणबाजीमुळे चर्चेत असलेले ओवेसी यांच्यापुढे काँग्रेस, भाजप अन् शिवसेना नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे. चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून ओवेसी यांनी पाचव्यांदा आपली आमदारकी कायम राखली आहे. दुपारी 12.46 पर्यंतच्या आकडेवारीनुसार अकबरुद्दीन ओवेसी यांना 64,853 मतं मिळाली आहेत. काँग्रेस उमेदवाराला 7475 मतं, भाजप उमेदवाराला 8137 मतं, टीआरएस उमेदवाराला 7658 मतं तर शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ 112 मतं मिळाली आहेत. अक्कीनामोनी व्यंकटेश या अपक्ष उमेदवाराला सर्वात कमी म्हणजे 60 मतं मिळाली आहेत.

विजयी उमेदवारास मिळालेल्या मतदानाच्या 1/3 (एक तृतिअंश) मतदान मिळवणे विरोधी उमेदवारास आवश्यक आहे. अन्यथा, त्या उमेदवाराची अनामत (डिपॉझिट) रक्कम जप्त होते. निवडणूक आयोगाच्या या नियमानुसार चारही दिग्गज पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

Web Title: Shiv Sena candidates get only 112 votes at telangana