Shiv Sena Case : सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर | Shivsena Hearing Live News | SC Final Decision Shiv Sena Controversy | LIVE Marathi News Updates | Maharashtra Breaking News LIVE | Latest Marathi News Headlines | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena Case

Shiv Sena Case : सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य केलं – CM शिंदे

घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य केलं असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हंटलं आहे.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय - देवेंद्र फडणवीस

सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो. लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपण विजय झाला आहे. हा जो काही निकाल आहे त्यातील चार पाच जे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यांपैकी पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरलं आहे. कारण उद्दव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही. दुसरं त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं आहे की, अपात्रतेचा सर्व अधिकार अध्यक्षांचा आहे. अध्यक्षच त्यावर निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले आहेत. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस- शिंदे यांची पत्रकारपरिषद सुरू आहे.

राजीनामा देणं कायदेशीरीत्या चूक असेल पण ...कोर्टाच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

देशामध्ये लोकशाहीची हत्या होते की काय असे वातावरण आहे. आम्ही अन्यायाविरोधात एकत्रितपणे लढतो आहोत. ते प्रयत्न आणखी बळकट करण्यासाठी नीतीश कुमार यांचे आभार.

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हा केवळ शिवसेनेविषयीचा नाही तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीचा होता. सत्तेसाठी हपालेल्यांना उत्तर दिले आहे. एकुणच राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले आहे. राज्यपाल यंत्रणा आतापर्यत आदराची होती. न्यायालयाच्या निकालानंतर ती यंत्रणा जिवंत ठेवायची की नाही हे दिसून आले आहे.

अपात्रतेचा विषय जरी अध्यक्षांकडे सोपवला असेल तर त्यांनी लवकारत लवकर तो निर्णय घ्यावा,

राजीनामा देणं कायदेशीरीत्या चूक असेल पण माझी लढाई ही जनतेसाठी आहे. आता देशाला वाचवायचं आहे. नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यायला हवा. शिंदेंनी मला नैतिकता शिकवू नये.

माझ्याप्रमाणे शिंदे फडणवीस यांनीही राजीनाम द्यावा. माझ्याच शिवसेनेचा व्हीप लागू होणार. निवडणूक आयोग म्हणजे काय ब्रम्हदेव नाही.

कोर्टाच्या निकालावर समाधानी; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. आम्ही जो निर्णय आहे त्याबाबत आम्ही समाधानी आहोत. जे लोकं कालपर्यत उड्या मारत होते त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. त्या चर्चाही थोतांड होत्या. याबाबतचे विश्लेषण पत्रकार परिषदेमध्ये करणार आहे.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर पूर्वस्थिती पुन्हा आणता आली असती

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर पूर्वस्थिती पुन्हा आणता आली असती असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे.

येत्या 15 दिवसांत अध्यक्षांनी निर्णय द्यावा अशी मागणी करणार - अनिल परब 

सुप्रीम कोर्टाने आपत्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हंटलं की, येत्या 15 दिवसात आमदारांच्या आपत्रतेवर निर्णय घ्यावा अशी मागणी आम्ही करणार असल्याचं त्यांनी म्हंटलं.

सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं निरीक्षणं 

ठाकरेंनी राजीनामा दिला नसतं तर, सरकार परत आणता आलं असतं.

राज्यात सुनावणी सुरू असताना राज्यात हालचालींना वेग 

राज्यात सुनावणी सुरू असताना राज्यात हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटायला जाणार आहेत. दुपारी दोन वाजण्याच्या आसपास फडणवीस राजभवन जाणार असल्याची माहीती समोर आली आहे.

दुपारी 2 वाजता शिंदे-फडणवीस यांची पत्रकार परिषद 

सत्ता संघर्षाच्या निकालानंतर दुपारी 2 वाजता शिंदे-फडणवीस यांची पत्रकार परिषद घेणार आहेत. कोर्टाने दिलेल्या निकालावर आणि राज्यातील परिस्थितीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आपत्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग 

आपत्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. 16 आमदार पात्र की अपात्र संबधीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे.

माझी नियुक्ती बेकायदेशीर, हे मत, निकाल नाही - भरत गोगवले 

माझी नियुक्ती बेकायदेशीर, हे मत, निकाल नाही असं भरत गोगवले यांनी म्हंटलं आहे. सुप्रीम कोर्टाने नवे प्रतोद बेकायदेशीर असल्याचं म्हंटलं त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी येथे वाचा - Bharat Gogawale: हे पद मी स्वतःहून...कोर्टाच्या निर्णयानंतर भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया

नैतिकतेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा- संजय राऊत 

नैतिकतेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

सुप्रीम कोर्टाचे आत्तापर्यंतचे महत्वाचे निर्णय

पहिली तीन निरीक्षण ठाकरे गटाच्या बाजूनं

नवाब रेबिया प्रकरण ७ सदस्यांच्या घटनापीठाकडं जण्याची गरज आहे.

अध्यक्षानी केवळ राजकीय पक्षाच्या व्हीपलाच मान्यता द्यायला हवी. त्यामुळं भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदा असल्याचं कोर्टानं म्हटलं.

पक्षांतर्गत वादाकडं राज्यापलांनी पाहण्याचा अधिकार नाही.

जे पत्र राज्यपालांना देण्यात आलं होतं. पण त्यांच्या अधिकार क्षेत्रात ते येत नाही.

निवडणूक आयोगाला पक्षनाव आणि चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार

राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय देणं बेकायदेशीर होतं. पण उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही कारण त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे

सविस्तर बातमी येथे वाचा - Shivsena Case : सत्तासंघर्षाच्या निकालात कोर्टानं सांगितलेले महत्वाचे '7' मुद्दे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा! 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कोर्टाने हा दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी तो राजीनामा द्यायला नको होता. तो दिला त्यामुळे पुढील अडचणी वाढल्या. आम्ही त्यावेळी काही करु शकलो असतो. ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे अनेक अडचणी वाढल्या.

सविस्तर बातमी येथे वाचा - ShivSena Case : एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

राज्यपालांना राजकारणात भाग घेता येणार नाही, जे पत्र राज्यपालांकडे दिले होते त्यात सरकारचा पाठींबा काढले होते त्यात सरकारला धोका असे दिसून आले नाही. राज्यपालांनी प्रश्न सोडवला असे म्हणता येणार नाही. राज्यपालांचे अधिकार वेगळे आहेत. राज्यपालांचा बहुमत चाचणी बोलावण्याचा निर्णय वैध नाही. तो संविधानिक नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे.

सविस्तर बातमी येथे वाचा - Shiv Sena Case: राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर; सुप्रीम कोर्टानं फटकारलं

बहुमतचाचणी घेण्याची घेण्याची गरज नव्हती - कोर्ट 

बहुमत चाचणी घेण्याची गरज नव्हती असं कोर्टाने म्हंटलं आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे होते म्हणत कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणीचा वापर नको असं कोर्टाने म्हंटलं आहे.

कारवाई करण्यासाठी केलेला युक्तिवाद पळपुटा, राज्यपालांना कोर्टानं दिला झटका

दहाव्या सुचीनुसार पक्षांर्गत फुटीला कोणताही अधिकार नाही, त्याला अर्थ नाही. कुठलाही गट पक्षावर दावा करु शकत नाही. या निकालामध्ये तिसरे महत्वाचे आहे. ते राज्यपालांबाबत आहे. बहुमत चाचणी बोलावण्यासाठी आलेली बैठक वैध नाही. कारवाई करण्यासाठी केलेला युक्तिवाद पळपुटा, राज्यपालांना कोर्टानं झटका दिला आहे.

शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का! पहिली दोन निरीक्षणे ठाकरे गटाच्या बाजूने

पहिली दोन निरीक्षणे ठाकरे गटाच्या बाजूने आली आहेत.

शिंदे गटाचे प्रतोद बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट 

शिंदे गटाचे प्रतोद बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हंटलं आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात वाचनाला सुरूवात

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात वाचनाला सुरूवात झाली आहे. अध्यक्षांच्या अधिकारचं प्रकरण ७ न्यायमूर्ती यांच्या पिठाकडे देण्यात आलं. या निकालाचं फेरविचार करण्यात य़ावा असं न्यायमुर्तींनी म्हंटलं आहे.

सुप्रीम कोर्ट वेगळा निर्णय देऊ शकते; कायदेतज्ज्ञांनी निकालाआधी व्यक्त केली शक्यता

कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या येणाऱ्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालय वेगळा निर्णय देईल असं वाटतंय. पक्षांतर्गत बंदीसंदर्भात देशातील सगळ्यात वेगळा निर्णय येऊ शकतो, असेही सरोदे म्हणाले आहेत. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी पत्र पाठवेल, कोर्ट काही वेळ देऊ शकतं, राज्यपालांनी घेतलेल्या फ्लोअर टेस्टबाबत पण निर्णय येऊ शकतो. तो अधिकार कदाचित नरहरी झिरवळ यांच्याकडे येऊ शकतो. पक्षविरुद्ध कारवाई केल्याचे सरळ-सरळ दिसत आहे. त्यामुळे यावरही कोर्ट निर्णय देऊ शकतं. सुप्रीम कोर्टच अपात्रतेचा निकाल देईल अशी शक्यता. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टच देईल. अन्य आमदार मग अपात्र ठरू शकतात आणि हा निर्णय कोर्ट देईल.

शिंदे-फडणवीस सरकारच महाराष्ट्रात कायम राहणार - राणे

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचाच विजय होणार, शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्रात कायम राहणार, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे.

“अब हमारी भूमिका खतम”, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची प्रतिक्रिया!

राज्यातील सत्ता संघर्षावर भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निकाल येईपर्यंत त्यावर काही बोलणं मूर्खपणा ठरेल. आता या सगळ्यातली माझी भूमिका संपली आहे. आता न्यायालय माझ्या भूमिकेवर जे बोलेल, त्यावर आम्ही बोलू असं त्यांनी म्हंटलं आहे.

सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस घेणार पत्रकार परिषद

सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

निकालाच्या पार्श्वभूमिवर पोलस अलर्टवर! मुंबईसह राज्यात बंदोबस्त वाढवला

मुंबई : सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. निकालानंतर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. महाराष्ट्रासह मुंबईतील काही ठिकाणी तसेच मातोश्री, शिवसेना भवन आणि सामना कार्यालयाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काही क्षणात निकाल वाचनाला होणार सुरवात 

महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या सुनावणीला काही क्षणात निकाल वाचनाला सुरवात होणार आहे. CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठ हा निकाल देणार आहे. खंडपीठाने एकमताने दिलेला निर्णय आहे. हा निकाल CJI यांनी लिहिला असून थोड्याच वेळात तो वाचून दाखवला जाईल.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाचा निकाल अर्धा तास उशीर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ११:३० वाजता निकाल येण्याची शक्यता आहे.

माजी सरन्यायाधीश ए. एम. अहमदी यांना श्रद्धांजली वाहिली 

नुकतेच निधन झालेले माजी CJI ए. एम. अहमदी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, दिल्ली सरकार-एलजी वादावर निर्णय देण्यासाठी घटनापीठ एकत्र येईल. त्यानंतर शिवसेना खटल्याचा निकाल दिला जाणार आहे

हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे - संजय राऊत

देवेंद्र फडणवीसांना सत्याची जाणीव झाली असेल. ते किंवा त्यांनी मांडीवर घेतलेले सगळे मूर्खच बोलत आहेत की निकाल त्यांच्या बाजूने लागेल. हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे असं संजय राऊत म्हणालेत.

'एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात, ते आता तिन दिवस जादूटोणा करायला गेले होते'- चंद्रकांत खैरे 

एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात, ते आता तिन दिवस जादूटोणा करायला गेले होते. एकनाथ शिंदे यांच्या तोंडात पांढरा खडा असतो, ते समोरच्याच वशिकरण करतात. हे छु छा करणारे व्यक्ती आहे, हे मला माहीत आहे असं म्हणालेत.

आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे - संजय राऊत 

आज जो निकाल येईल त्यावरून दिसून येईल की, देशात लोकशाही असेल की नाही. सुप्रीम कोर्ट लोकशाहीची हत्या करणार नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. निकालानंतर संपूर्ण कचित्र स्पष्ट होईल असंही राऊत म्हणालेत.

निकालानंतर भरपूर घडामोडी घडतील, मविआचे आमदार, खासदार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

निकालानंतर भरपूर घडामोडी घडतील. ठाकरे गटातील काही आमदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातले काही आमदार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. याची प्रचिती तुम्हाला एक-दोन महिन्यांत येईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालात ठाकरेंची 'ती' एक चूक पलटवणार 'गेम'? शिंदे गटाचा दावा

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हंटलं की, 'निर्णय आमच्याच बाजुने लागेल. आम्ही पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे पक्ष विरोधी कारवाईचा प्रश्नच नाही. त्यामुळे 16 आमदार हे कायदेशीर आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याऐवजी बहुमत चाचणीला सामोरे गेले असते व त्याबाबत पक्षादेश देऊन सांगितलेल्या उमेदवाराला आम्ही मतदान केलं नसतं तर आम्ही सर्वजण धोक्यात व बेकायदेशीर होतो. मात्र तसं काहीही झालं नाही. त्यामुळे 16 आमदारांना कुठलाही धोका नसल्याचं पाटील यांनी म्हटलंय

16 आमदारांचा निकाल लागेल तोही इतर आमदारांना लागू होईल - अनिल परब 

16 आमदार अपात्र ठरले तर इतरही आमदार अपात्र ठरतील असं अनिल परब यांनी म्हंटलं आहे. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय 16 आमदारांसाठी असेल तोच निर्णय इतर आमदारांना लागू होईल असं ते म्हणालेत.

काय डोंगर, काय हिरवळ वाट पाहतोय तुमची 'नरहरी झिरवळ', संजय राऊतांचं ट्वीट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नॉट रीचेबल असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

145 चा आकडा आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नाही- अजित पवार

जोपर्यंत 145 चा आकडा त्यांच्याकडे आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधीच ठरलं; ठाकरे गटाचं पोस्टर VIRAL

सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देणार त्यावरून राज्यात नेमकी कोणाची सत्ता असणार हे ठरणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर एक पोस्टर वायरल केल जात आहे. या पोस्टरमध्ये निकाल ठाकरे गटाच्याच बाजूने लागणार असं म्हटलं जात आहे.


नरहरी झिरवळ रीचेबल

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद होते तर ते गावच्या घरीही उपस्थित नाहीत. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी नॉट रीचेबल असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या त्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून झिरवळ आपल्या गावात असल्याचं समोर आलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर महत्वाच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद आहेत तर ते गावच्या घरीही उपस्थित नाहीत. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी नॉट रीचेबल आहेत. 

जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; चौकशीला हजार राहण्याचे आदेश

जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. चौकशीला हजार राहण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज निकाल; CM शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार?

शिंदे गटातील 16 आमदार कोण?

 • एकनाथ शिंदे 

 • अब्दुल सत्तार 

 • तानाजी सावंत 

 • यामिनी जाधव

 • संदिपान भुमरे

 • भरत गोगावले 

 • संजय शिरसाट

 • लता सोनवणे 

 • प्रकाश सुर्वे 

 • बालाजी किणीकर 

 • बालाजी कल्याणकर

 • अनिल बाबर

 • संजय रायमुलकर 

 • रमेश बोरणारे 

 • चिमणराव पाटील 

 • महेश शिंदे

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज लागणार निकाल

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज निकाल लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की, शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमतानं येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वाद सुप्रीम कोर्टात गेला होता. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरण्याबाबत ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती. त्यामुळं यावर काय निर्णय येतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.