शिवसेनेची उत्तर प्रदेशच्या राजकारणात उडी; 25 जागा लढविणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 जानेवारी 2019

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेला शिवसेना पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 25 जागा लढविणार आहे. त्यासाठी शिवसेनेने सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) नेते ओम प्रकाश राजभर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे. 

राजभर यांचा एसबीएसपी उत्तर प्रदेशातील राजकारणात युती सरकारमधील घटक पक्ष आहे. त्यांच्या पक्षाशी हातमिळवणी करून शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. यासाठी शिवसेनेनेही जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राजभर यांच्याशी युती संदर्भात चर्चा केली आहे. लखनौ येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजपवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यावर ते म्हणाले, लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशसह कोणत्याही प्रकारच्या युतीचा प्रश्न उपस्थित होत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष उत्तर प्रदेशमधून 25 जागा लढविणार आहे.   

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात निवडणूक लढविण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या भाजप-सेना युतीमध्ये अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Shiv Sena to Contest on 25 Seats in Uttar Pradesh