खासदार गायकवाड यांचा दिल्ली प्रवास मोटारीने

पीटीआय
बुधवार, 29 मार्च 2017

उस्मानाबाद- एअर इंडियाच्या कर्मचाऱयाला मारहाण केल्यानंतर विमान प्रवासावर बंदी घातलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिल्ली पर्यंतचा प्रवास करण्यासाठी मोटारीचा पर्याय निवडला आहे.

उस्मानाबाद- एअर इंडियाच्या कर्मचाऱयाला मारहाण केल्यानंतर विमान प्रवासावर बंदी घातलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिल्ली पर्यंतचा प्रवास करण्यासाठी मोटारीचा पर्याय निवडला आहे.

गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱयाला चपेलेने मारहाण केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. एअर इंडियासहित इतर विमान कंपन्यांनी त्यांना काळ्या यादीत टाकल्यामुळे त्यांच्या विमान प्रवासावर बंदी आली आहे. विमान प्रवास बंद असल्यामुळे रेल्वे किंवा मोटार हे पर्याय त्यांच्यापुढे होते. दिल्लाचा प्रवास करण्यासाठी त्यांना मोटारीला पसंती दिली आहे. लोकसभेत हजेरी लावण्यासाठी गायकवाडे हे मोटारीने आज (बुधवार) दिल्लीकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
गायकवाड यांनी एअर इंडियाच्या हैदराबाद ते दिल्ली एआय 551 या विमानाचे तिकीट काढले होते, मात्र ते रद्द करण्यात आले आहे. यानंतर गायकवाड यांनी एअर इंडियाच्या एआय 806 या विमानाचे तिकीट बूक केले होते. मात्र, कंपनीने ते तिकीटसुद्ध रद्द केले आहे. यामुळे त्यांनी दिल्लीला मोटारीने जाणे पसंत केल्याचे समजते.

Web Title: Shiv Sena MP Ravindra Gaikwad travels by car to Delhi