... नाहीतर जग भारताला 'नामर्द' म्हणेल: संजय राऊत 

वृत्तसंस्था
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

शस्त्रसंधी भंगाची चर्चाच आता सोडून द्या. हे तर सरळ सरळ युद्ध सुरु आहे.पाकिस्तानच्या या हल्ल्यास तशाच पद्धतीने प्रत्युत्तर द्यावयास हवे. आणि तुम्हाला तसे उत्तर देता येत नसेल; तर सगळ्या जगात भारताची नामर्द म्हणून नाचक्की होईल

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी भंगासंदर्भात बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (सोमवार) केंद्र सरकारला लक्ष्य केले. 

""पाकिस्तानने काल भारतावर हल्ला करण्यासाठी क्षेपणास्त्रे वापरली. आपली क्षेपणास्त्रे केवळ राजपथवर दाखविण्यासाठी आहेत काय? भारतीय क्षेपणास्त्रे 26 जानेवारीच्या संचलनादरम्यान परकीय पाहुण्यांना दाखविण्यासाठीच आहेत काय? शस्त्रसंधी भंगाची चर्चाच आता सोडून द्या. हे तर सरळ सरळ युद्ध सुरु आहे.पाकिस्तानच्या या हल्ल्यास तशाच पद्धतीने प्रत्युत्तर द्यावयास हवे. आणि तुम्हाला तसे उत्तर देता येत नसेल; तर सगळ्या जगात भारताची नामर्द म्हणून नाचक्की होईल,'' अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली. 

पूँच जिल्ह्यात प्रत्यक्ष ताबा रेषेलगतच्या भागात लष्कराच्या आघाडीच्या चौकीवर पाकिस्तानने गोळीबार केला. दिवसभर अधूनमधून गोळीबार सुरूच होता. सायंकाळी भीमबर गली सेक्‍टर आणि मंजाकोट सेक्‍टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार वाढला. भारतानेही या गोळीबाराला चोख उत्तर दिले; पण यात तीन जवान हुतात्मा आणि दोन जण जखमी झाले. जखमी झालेल्या अधिकाऱ्यास दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. भीमबर गली सेक्‍टरवर पाकिस्ताननकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, पूँच जिल्ह्यात शाहपूर सेक्‍टरमध्येदेखील आज सकाळी 11 च्या सुमारास गोळीबार झाला. या ठिकाणी उखळी तोफांचा मारा करण्यात आला. 

Army

या पार्श्‍वभूमीवर केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा सरकारलाच लक्ष्य करण्यात आले आहे. 

Web Title: shiv sena pakistan ceasefire violation india