
अमरा बंगाल, उत्तर बंगा समाज पक्ष आणि उत्तर बंगा आदिवासी परिषद या पक्षांशी युती करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे राज्यातील सरचिटणीस अशोक सरकार यांनी सोमवारी दिली.
कोलकता - पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना लढविणार आहे. यासाठी अमरा बंगाल, उत्तर बंगा समाज पक्ष आणि उत्तर बंगा आदिवासी परिषद या पक्षांशी युती करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे राज्यातील सरचिटणीस अशोक सरकार यांनी सोमवारी दिली.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
झारग्राम येथील अजून एक पक्ष आघाडीत समाविष्ट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, राज्यात भाजपची प्रतिमा बंगालीविरोधी आणि हुकूमशाही अशी झाली आहे. आसाम, त्रिपुरासह ईशान्य भारतात ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, तेथे बंगाली नागरिकांमध्ये भेदभाव केला जात आहे. यामुळे बंगाली भाषा आणि संस्कृतीला विरोध करणाऱ्यांचा पराजय करण्याचा प्रयत्न ही आघाडी करेल. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील ही आघाडी विधानसभा निवडणुकीत १०० उमेदवार उतरवेल.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या आघाडीमुळे भाजपच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला असला तरी ज्या पक्षांचे बंगालमध्ये काहीही अस्तित्व नाही, त्यांच्या युतीबद्दल बोलण्याची काहीही गरज नाही, असे राज्यातील भाजप नेत्यांनी ही युती हस्यास्पद असल्याचे म्हटले आहे.