मोदींना आठवले जिजाऊ, शिवराय

नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवेळी शनिवारी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि गृहमंत्री राजनाथसिंह.
नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवेळी शनिवारी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि गृहमंत्री राजनाथसिंह.

नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाबाईंनी स्वराज्य स्थापन करण्यास सांगितले व आज त्यांचा आत्मा आम्हाला सांगतोय की ‘जा, सुराज्य व सुशासनाची प्रतिष्ठापना करा,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात सांगितले. केंद्रातील सत्तारूढ भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला अलीकडे शिवराय, जिजाऊ, स्वराज्यापासून पानिपतापर्यंत मराठ्यांच्या इतिहासाची वारंवार आठवण होणे सूचक मानले जाते. 

शहा यांनी शुक्रवारच्या उद्‌घाटनपर भाषणात २०१९ ची लढाई पानिपतची तिसरी लढाई असेल, असे सांगून ‘भाजप हरल्यास देश गुलामीत जाईल’ असा सूचक इशारा दिलेला होता. पाठोपाठ मोदींना आज राजमाता जिजाऊंची आठवण आली. 

आज जिजाबाईंची जयंती आहे, हे मोदींना कसे समजले, याचा विलक्षण योगायोग आज व्यासपीठावरच घडल्याचे समजते. राजकीय ठरावांवर आज सकाळी चर्चा सुरू होती. त्याचवेळी मोदींनी शहांमार्फत नितीन गडकरी यांच्याकडे एक चिठ्ठी दिली. त्यांनी ती पलीकडे बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली. त्याबरोबर फडणवीस उठून मोदींजवळ गेले. दोघांत काही कानगोष्टी झाल्या. सूत्रांच्या महितीनुसार, मोदींनी फडणवीस यांना जिजाबाईंच्या जयंतीबाबत काही माहिती विचारली. जिजाबाईंच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावूनच फडणवीस रामलीला मैदानावर दाखल झाले होते. साहजिकच नंतर मोदींनी आपल्या भाषणात विवेकानंदांबरोबरच जिजाऊंच्याही स्मृती जागविल्या. राजमाता जिजाऊंचा आत्मा, त्यांचा मोदींनाच मिळालेला सांगावा, स्वराज्य व प्रस्तावित सुराज्य, अशी त्यांनी मांडणी केली, असे समजते.

शिवरायांवरही हक्क सांगण्याची धडपड
महाराष्ट्रातील युतीतील तणातणी व काँग्रेस आघाडीकडील बातम्यांचा झोत स्वतःकडे वळवून घेणे, या गनिमी काव्याची रचना राज्यातील नेतृत्वाने केल्याची चर्चा राजधानीत आहे. शिवरायांच्या नावाचा वारंवार उद्‌घोष करून गांधी-आंबेडकर-पटेल यांच्यापाठोपाठ शिवरायांवरही आपलाही हक्क सांगण्याची भाजपची ही धडपड मानली जाते. त्या पार्श्‍वभूमीवर मोदींना राजमाता जिजाबाईंच्या जयंतीची आठवण होणे सूचक मानले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com