बेळगावात शिवजयंतीनिमित्य महाराष्ट्रातील विविध गडावरून शिवज्योती

मिलिंद देसाई
सोमवार, 6 मे 2019

बेळगाव - येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शिव जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील विविध गडावरून शिवज्योत आणण्याची परंपरा येथे अनेक वर्षांपासून सुरू आहे. हीच परंपरा जोपासत रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आदी गड किल्लांवरून आणलेली शिवज्योत आज शहरात दाखल झाली.

शिवजोतीनंतर या शिवजयंती उत्साहाला शहरात आजपासून प्रारंभ झाला.  आज पहाटेपासूनच विविध मंडळांचे कार्यकर्ते शहरात शिवज्योत घेऊन दाखल होत आहे. धर्मवीर संभाजी चौकात मध्यवर्ती शिव जयंती उत्सव महामंडळाच्यावतीने शिव ज्योतींचे स्वागत करण्यात आले.

शिवाजी महाराज यांचा इतिहास नव्या पिढीला समजावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार शहर आणि परिसरात शिव जयंतीनिमित्य तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी महाराजांचा इतिहास दर्शविणारे जिवंत देखावे सादर केले जाणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivjayanti in Belgaum