शिवपाल यादव यांची नव्या पक्षाची घोषणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

इटावा (उत्तर प्रदेश)- समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवपालसिंह यादव यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा मंगळवारी केल्याने पक्षातील "यादवी'ला आता नवी कलाटणी मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर म्हणजे 11 मार्चनंतर नवीन पक्ष अस्तित्वात येईल, असे त्यांनी समर्थकांना सांगितले.

इटावा (उत्तर प्रदेश)- समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवपालसिंह यादव यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा मंगळवारी केल्याने पक्षातील "यादवी'ला आता नवी कलाटणी मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर म्हणजे 11 मार्चनंतर नवीन पक्ष अस्तित्वात येईल, असे त्यांनी समर्थकांना सांगितले.

उत्त्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी तीव्र मतभेद झाल्यानंतर दुखावलेल्या शिवपाल यादव यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेऊन पुतण्या अखिलेशला आव्हान दिल्याचे मानले जात आहे. ""तुम्ही सरकार स्थापन करा, आम्ही नवीन पक्ष स्थापन करू,'' असे शिवपाल यादव म्हणाले. ""पक्षहिताविरोधात काम करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा अखिलेश यादव यांनी आज दिला. त्यानंतर काही मिनिटांतच शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली.

समाजवादी पक्षातील अंतर्गत वाद विकोपाला गेले असल्याचे यादव यांच्या या घोषणेवरून सूचित होत आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, ""पक्षाचे तिकीट दिल्याबद्दल मी अखिलेश यादव यांचा ऋणी आहे. नाही तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली असती. मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी इच्छा माझ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. जर पक्षाचे तिकीट मिळाले नसते तर मी तसा निर्णय घेतला असता.'' पक्षाचे जे बंडखोर उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत, त्यांचा प्रचार आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
""माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत माझी निष्ठा नेताजींवर (मुलायमसिंह यादव) असेल. त्यांची मानहानी कदापी सहन केली जाणार नाही, असा इशारा देत ते म्हणाले, सर्व काही मी मान्य करेन, पण नेताजींचा अपमान कधीही सहन करणार नाही,'' असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.

Web Title: Shivpal Yadav announced a new party