शिवराजसिंह म्हणतात, टायगर अभी जिंदा है!

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

शिवराजसिंह चौहान म्हणाले, की मध्य प्रदेशात पुन्हा सत्तेत येण्यासाठी पाच वर्षे पण लागणार नाहीत. मुख्यमंत्री निवासात लवकरच परतणार आहे. राज्यातील नागरिकांनी दिलेले अपार प्रेम, स्नेह याबद्दल मी आभारी आहे. बुधनी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसोबत मी आहे. आपण सर्व मिळून मध्य प्रदेशच्या विकासासाठी काम करू.

भोपाळ : पराभव झाला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण, टायगर अभी जिंदा है, असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा काँग्रेसने पराभव करत सत्ता स्थापन केली आहे. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. भाजपच्या या पराभवाला मी स्वतः जबाबदार असल्याचे शिवराजसिंह यांनी यापूर्वीच मान्य केले आहे. शिवराजसिंह यांनी बुधवारी मुख्यमंत्री निवास सोडले. त्यांच्या बुधनी विधानसभा मतदारसंघातील नागरिक त्यांच्या भेटीसाठी गेली असता त्यांनी हे वक्तव्य केले.

शिवराजसिंह चौहान म्हणाले, की मध्य प्रदेशात पुन्हा सत्तेत येण्यासाठी पाच वर्षे पण लागणार नाहीत. मुख्यमंत्री निवासात लवकरच परतणार आहे. राज्यातील नागरिकांनी दिलेले अपार प्रेम, स्नेह याबद्दल मी आभारी आहे. बुधनी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसोबत मी आहे. आपण सर्व मिळून मध्य प्रदेशच्या विकासासाठी काम करू. 

Web Title: Shivrajsingh Chouhan warn Congress government in Madhya Pradesh