फोन आला अन् चहा न घेताच शिवराजसिंह दिल्लीला रवाना

फोन आला अन् चहा न घेताच शिवराजसिंह दिल्लीला रवाना

नवी दिल्ली- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गेले बावीस वर्षे सुरु असलेल्या व्यक्तीगत प्रथेप्रमाणे आज ज्योर्तिलींग त्र्यंबकेश्‍वरचे दर्शन घेऊन धार्मिक विधी केले. त्याचवेळी त्यांना नवी दिल्लीतून फोन आल्याने ते धार्मिक कार्यक्रम आटोपताच चहा न घेताच ते रवाना झाले.

शिवराजसिंह चौहान गेले बावीस वर्षे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी, शनी शिंगणापूर येथे दर्शन घेऊन नाशिकला मुक्काम करतात. दुसऱ्या दिवशी त्र्यंबकेश्‍वरला दर्शन व धार्मिक विधी केल्यावर परिसरातील पुरोहितांसमवेत निवांत गप्पांत रंगतात. त्यानुसार शिर्डी व शनी शिंगणापूर येथील कार्यक्रम आटोपून ते आज सकाळी पत्नी व दोन्ही मुलांसह त्र्यंबकेश्‍वरला आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यावर आरती व अभिषेक केला. त्याचे पौरोहित्य वामन गायधनी यांनी केले. यावेळी मध्य प्रदेशातील अन्य भाविक दर्शनासाठी आले होते. त्यांना त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

विश्‍वस्त प्रशांत गायधनी, अॅड. श्रीकांत गायधनी यांसह विविध पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. यावेळी त्यांना नवी दिल्लीहून दुरध्वनी आला. त्यानंतर मात्र ते लगचेच रवाना झाले. एरव्ही ते स्थानिकांशी गप्पा करतात. चहा अल्पपोहार घेतात. मात्र, यंदा तातडीचा निरोप असल्याने चहा न घेताच रवाना झाले. तातडीचे काम असल्याने त्यांना जावे लागल्याचे त्यांच्यासमवेत असलेल्या अॅड. श्रीकांत गायधनी यांनी 'सरकारनामा' प्रतिनिधीला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com