नोटाबंदी विरोधातील मोर्चावरून शिवसेना संभ्रमात

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नोटबंदीच्या मुद्द्यावरून उद्या (बुधवार) संसदेबाहेर होणाऱ्या मोर्चाबाबत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सावध भूमिका घेतली आहे.

नवी दिल्ली - नोटबंदीच्या मुद्द्यावरून उद्या (बुधवार) संसदेबाहेर होणाऱ्या मोर्चाबाबत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सावध भूमिका घेतली आहे.

शिवसेनेच्या 13 खासदारांनी आज (मंगळवार) दुपारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर शिवसेनेच्या खासदारांनी माहिती देताना सांगितले, की आम्ही सहकारी व जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत घातलेल्या बंदीवर पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सहकारी व जिल्हा बँकांना कोणत्या व्यवस्थेत बसवायचे याबद्दल आरबीआयशी चर्चा करावी लागेल असे आश्वासन मोदींनी दिले. विरोधी पक्षांकडून उद्या होत असलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत आम्ही लवकरच धोरण ठरवू.

शिवसेनेकडून पंतप्रधानांच्या या निर्णयाला जोरदार विरोध करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सतत मोदींवर या निर्णयावरून टीका केली आहे. ममता बॅऩर्जी आणि डाव्या पक्षांनी काढलेल्या मार्चमध्ये शिवसेनेचे खासदार सहभागी झाले होते. आता उद्या शिवसेनेचे खासदार काय भूमिका घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Shivsena confused on Demonetisation march in new delhi