मोदींच्या कार्यकाळात सर्वात जास्त जवान मारले गेले - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मागील चार वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून जेवढे जवान सिमेवर मारले गेले, तितके मागच्या 50 वर्षातही मारले गेले नाहीत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरमधील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील चकमकीत आज (ता. 7) चार जवान हुतात्मा झाले. गुरेज भागात जवान गस्त घालत असतानाच आठ दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली, त्यामुळे दोन दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले. तर चार जवान हुतात्मा झाले. मेजरसह तीन जवानांचा यात समावेश आहे. या घटनेमुळे शिवसेनेने भाजप सरकारवर टीका केली. 

मागील चार वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून जेवढे जवान सिमेवर मारले गेले, तितके मागच्या 50 वर्षातही मारले गेले नाहीत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. सातत्याने जवान मारले जाणे हे दुर्दैवी आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.   

दहशतवादी व जवान यांच्या चकमकीनंतर पसार झालेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधकार्य सुरू आहे. 

Web Title: shivsena leader sanjay raut criticized narendra modi