देशद्रोही युती तुटल्याचा आम्हाला आनंद: संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) व पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी (पीडीपी) यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे. भाजप व पीडीपी यांच्यातील युती देशद्रोही युती होती, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (मंगळवार) दिली.

भाजपने आज मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही आपला राजीनामा राज्यपालांकडे दिला. भाजपानेही सरकारचे समर्थन मागे घेतल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे.

जम्मू-काश्मीरच्या एकूण राजकीय परिस्थितीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपली तिखट प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे. भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती देशद्रोही युती होती.'

जम्मू-काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने उठवल्यानंतर भाजप आणि पीडीपीमध्ये तणाव निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. शिवाय सीमेवरील तणाव, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जवानांवर होणारी दगडफेक, कठुआ गँगरेप याबाबतच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पीडीपीमध्ये मतभेद निर्माण झाले होते, त्याचा शेवट आज युती तुटण्यातून झाला. जम्मू काश्मीरात राज्यपाल राजवट लागू करावी अशी मागणीही यावळी भाजपने केली आहे.

Web Title: shivsena leader sanjay raut reaction on bjp pulls out of an alliance with pdp in kashmir