शिवसेना खासदार आक्रमक; संसदेबाहेर सरकारविरोधात निदर्शने

वृत्तसंस्था
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

शिवसेना खासदारांनी आज संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. संसदेबाहेर आक्रमक झालेली शिवसेना संसदेत काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते. अखेर शिवसेना खासदारांनी लोकसभेतही गदारोळ घातला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. केंद्राने अतिरिक्त मदत जाहीर करावी आणि महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी, अशा मागण्या करत शिवसेना खासदारांनी आज (सोमवार) संसदेबाहेर सरकारविरोधात निदर्शने केली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेना खासदारांनी आज संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. संसदेबाहेर आक्रमक झालेली शिवसेना संसदेत काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते. अखेर शिवसेना खासदारांनी लोकसभेतही गदारोळ घातला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तसेच ओला दुष्काळ संदर्भात स्थगन प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

सरकारच्या अजेंड्यावर 36 विधेयके; हिवाळी अधिवेशन आजपासून

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये सत्तास्थापनेवरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा तणावामुळे हे दोन्ही पक्ष परस्परांपासून दुरावले होते. शिवसेनेच्या रोजच्या वाग्बाणांमुळे घायाळ झालेल्या दिल्लीतील भाजपश्रेष्ठींनी अखेर रविवारी युतीच्या काडीमोडावर शिक्कामोर्तब केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनीच राज्यातील युतीचा संसार मोडल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे खासदार आता विरोधी बाकांवर बसतील हे स्पष्ट आहे. आता शिवसेना खासदार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

2022 मध्ये मुंबईचा महापौर भाजपचाच : आशिष शेलार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena leaders hold protest in Parliament premises