esakal | शिवसेना करू शकते राज्यसभेतून सभात्याग; भाजपला फायदाच?
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपची साथ सोडून, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यानंतर त्यांच्या भूमिकेनंतर काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिवसेनेने या विधेयकाबाबत काही प्रश्न असल्याचे म्हटले होते. राज्यसभेत योग्यवेळी ठरवू असे सूचक विधान संजय राऊत यांनी केलेले आहे.

शिवसेना करू शकते राज्यसभेतून सभात्याग; भाजपला फायदाच?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यसभेत आज (बुधवार) केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सादर केल्यानंतर हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपपुढे मोठे आव्हान आहे. मात्र, एकेकाळचा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार राज्यसभेतून मतदानावेळी सभात्याग करून एकप्रकारे भाजपला मदत करण्याची शक्यता आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यात यश आले होते. आज (बुधवार) हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले आहे. राज्यसभेत सरकारला इतर पक्षांची गरज पडणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे शिवसेना भाजपला राज्यसभेत मदत करेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पण, शिवसेनेने राज्यसभेतून सभात्याग करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.