esakal | पवारांनी वळून पाहिले पण राऊत निघून गेले!
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut, Sharad Pawar

मोदी आणि पवार यांची आज दुपारी साडेबारा वाजता लोकसभेत भेट होणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंगळवारीच भेट होणार होती. पण, ती होऊ न शकल्याने आज ही भेट होणार आहे. पवार यांनी अद्याप राज्यातील सत्ता स्थापनेचे पत्ते उघड केलेले नाहीत.

पवारांनी वळून पाहिले पण राऊत निघून गेले!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. राज्यसभेत या दोघांमध्ये पाच मिनिटे चर्चा झाल्यानंतर पवार त्यांना मागे वळून पाहत होते पण तोपर्यंत राऊत तेथून निघून गेले होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मोदी आणि पवार यांची आज दुपारी साडेबारा वाजता लोकसभेत भेट होणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंगळवारीच भेट होणार होती. पण, ती होऊ न शकल्याने आज ही भेट होणार आहे. पवार यांनी अद्याप राज्यातील सत्ता स्थापनेचे पत्ते उघड केलेले नाहीत. तसेस त्यांनी ज्यांना सर्वाधिक जागा आहेत आणि जे युतीत लढले आहेत, त्यांना सत्ता स्थापनेबाबत विचारा असे म्हटले होते. पण, आता महाशिवआघाडी सत्तेच्या दिशेने जाताना दिसत आहे. त्यातच आज राऊत यांची पवार भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...  

महाराष्ट्रात भाजपला 105 जागा मिळूनही शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापन करता आलेली नाही. तर, दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आजच्या या दोघांच्या बैठकीला महत्त्व आले आहे.  

शरद पवार-नरेंद्र मोदींची दिल्लीत होणार भेट; काय असेल?