संजय राऊत कलम 370वर बोलले; अमित शहांनी अभिमानाने बाक वाजवला

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

कलम 370  हटवण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राज्यसभेत ऐतिहासिक विधेयक मांडलं. या विधेयकाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत खंबीर पाठिंबा दिला. 

नवी दिल्ली : कलम 370  हटवण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राज्यसभेत ऐतिहासिक विधेयक मांडलं. या विधेयकाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत खंबीर पाठिंबा दिला. 

कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. या कलमामुळे आपण 70 वर्षांपासून हा देश, संविधानावर एक डाग घेऊन चालत होतो. तो डाग आज धुवून टाकला गेला, असे जोरदार भाषण करत संजय राऊत यांनी अमित शाहांना पाठिंबा दिला.” संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान अमित शाहांनी त्यांना पाठिंबा देत अभिमानाने बाक वाजवला.

दरम्यान, मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कलम 370 हटवून विशेषाधिकारही काढून टाकण्यात आले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीरचं विभाजन करुन जम्मू काश्मीर आणि लडाख ही दोन केंद्रशासित राज्यांच्या निर्मितीची घोषणा केली. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे मात्र लडाखमध्ये विना विधानसभा केंद्रशासित राज्य असेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena mp sanjay raut speech in rajyasabha on article 370