उत्तर प्रदेश, गोव्यात शिवसेनाही निवडणूक लढणार!

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

मुंबई : निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांतील निवडणूक कार्यक्रमाची आज घोषणा केली. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये स्वतंत्रपणे तर गोव्यात काही पक्षांसोबत युती करून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आगामी विधनसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, 'महाभारताचे बिगूल पुन्हा एकदा वाजले आहे. शिवसेनाही या युद्धाचा एक भाग असेल. विशेषत: गोवा आणि उत्तर भारतामध्ये. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही बैठक घेणार आहोत. त्यामध्ये ते पक्षाची भूमिका मांडणार आहेत. गोवा आणि उत्तर भारतातील निवडणूक लढण्यासाठीची तयारी जवळपास झाली आहे. महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना कोणत्याही युतीशिवाय स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. गोव्यामध्ये गोवा सुरक्षा मंच आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत युती करून आम्ही तेथे पाच जागांवर निवडणूक लढवणार आहोत.'

पंजाब आणि गोवा येथील विधानसभेसाठी 4 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 403 जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय उत्तराखंड आणि मणिपूर येथील निवडणूक कार्यक्रमही आज आयोगाने जाहीर केला.

Web Title: Shivsena will fight in Goa, Uttar Pradesh