Female Cheetah Death: धक्कादायक! नामिबियातून भारतात आणलेल्या एका मादी चित्त्याचा मृत्यू

मृत्यू पावलेल्या चित्त्याच्या वैद्यकीय तपासणीतून मोठा खुलासाही झाला आहे.
Shasha
Shasha

नवी दिल्ली : अफ्रिकेतील नामिबिया या देशातून भारतात आणलेल्या अनेक चित्त्यांपैकी एक मादा चित्त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या वृत्तामुळं खळबळ उडाली असून या चित्त्याचा मृत्यू किडनीच्या आजारामुळं झाल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत कुनो राष्ट्रीय उद्यानानं रितसर प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. (Shocking Death of a female cheetah Shasha brought to India from Namibia)

प्रसिद्धीपत्रकानुसार, २२ डिसेंबर २०२२ रोजी नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेली 'शाशा' नामक मादा चित्ता सुस्तावस्थेत आढळून आला. निरीक्षण पथकाला असं वाटलं की 'शाशा'ला तातबडतोब उपचारांची गरज आहे. त्यानुसार तिला क्वारंटाइन क्षेत्रात आणण्यात आलं. यानंतर तिच्या रिक्ताची चाचणी करण्यात आली. यामध्ये धक्कादाक बाब समोर आली ती म्हणजे शाशाच्या किडनीला संसर्ग झाला होता. पण तिला भारतात आणण्यापूर्वीच संसर्ग झाल्याचं सांगितलं जात आहे.

Shasha
Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! रुबी हॉलपर्यंत धावली पुणे मेट्रो

दरम्यान, शाशाची मेडिकल हिस्ट्री देखील तपासण्यात आली, यामध्ये असं आढळून आलं की, शाशाला १५ ऑगस्ट २०२२ रोजी नामिबियात शेवटची रक्ताची चाचणी करण्यात आली यामध्ये रक्तात क्रियेटिनिनचं प्रमाण ४०० पेक्षा अधिक आढळून आलं. यामुळं हे स्पष्ट झालं की, शाशाला किडनीचा आजार हा भारतात आणण्यापूर्वीच जडला होता. पण डॉक्टरांकडून शाशाला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करुनही अपयश हाती आलं आणि २७ मार्च २०२३ रोजी तिचा अखेर मृत्यू झाला.

हे ही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

नामिबियातून पहिल्या खेपेत भारतात आणण्यात आलेल्या उर्वरित ७ चित्त्यांमध्ये ३ नर आणि १ मादी खुल्या जंगलामध्ये स्वच्छंदी विहार करत आहेत. त्यांचं आरोग्य उत्तम असून ते सामान्यपणे शिकारही करत आहेत. तसेच दुसऱ्या खेपेत दक्षिण अफ्रिकेतून आणलेले १२ चित्ते सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये असून त्यांची प्रकृती देखील उत्तम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com