दिल्लीत गोळीबार; सराईत गुन्हेगाराला अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

आज सकाळी हे दोघेजण मेट्रो स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. पण, अकबर आणि असिफ यांना पोलिसांनी घेरल्याचे समजल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरु केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

नवी दिल्ली - दिल्लीलीतल नेहरु प्लेस मेट्रो स्थानकाजवळ आज (सोमवार) सकाळी पोलिस आणि सराईत गुन्हेगार अकबर यांच्या चकमक झाली. या चकमकीनंतर अकबर याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरु प्लेस मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या चकमकीत एकही पोलिस जखमी झालेला नाही. या चकमकीनंतर 25 हजार रुपयांचे बक्षीस असलेला गुन्हेगार अकबर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह त्याचा अन्य एक साथीदारालाही अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांना वॉन्टेड यादीत हा होता.

आज सकाळी हे दोघेजण मेट्रो स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. पण, अकबर आणि असिफ यांना पोलिसांनी घेरल्याचे समजल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरु केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांनी बुलेटप्रुफ जॅकेट परिधान केली होती. 

Web Title: Shootout near Nehru Place metro station, Delhi Police nab wanted criminal