शोपियाँतील चकमक वादाच्या भोवऱ्यात; लष्करी विशेषाधिकारांचा मर्यादेपेक्षा अधिक वापर 

Shopian encounter
Shopian encounter

श्रीनगर : काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यामध्ये यंदा जुलै महिन्यामध्ये झालेली चकमक वादाच्या भोवऱ्यात सापडली असून या लष्कराने सशस्त्र दलांना दिलेल्या विशेषाधिकारांचा मर्यादेपेक्षा अधिक वापर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या चकमकीमध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील दोषींविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे लष्कराकडून सांगण्यात आले.

तत्पूर्वी लष्कराने 18 जुलै रोजी झालेल्या या चकमकीमध्ये तीन तरुण मारल्या गेल्याचा दावा केला होता. त्याचवेळी सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये राजौरीमधून तीन तरुण बेपत्ता झाल्याचे नमूद करण्यात आले होते. याची लष्कराने दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. या बेपत्ता तरूणांच्या नातेवाइकांनी या विरोधात पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. पुढे चार आठवड्यांमध्ये ही चौकशी पूर्ण करण्यात आली होती.

दरम्यान या प्रकरणामध्ये नेमक्या किती सुरक्षा अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कराच्या या खुलाशाचे आज राजकीय वर्तुळामध्ये पडसाद उमटले. लष्कराच्या या चौकशीचे सर्वच राजकीय पक्षांकडून स्वागत करण्यात आले. राज्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या प्रकरणातील पुढील चौकशीची प्रक्रिया अधिक पारदर्शक असावी आणि दोषींना शिक्षा मिळायला हवी असे मत मांडले. अपनी पार्टीचे प्रमुख गुलाम हसन मीर यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com