Shraddha Murder Case : पत्नीची हत्या करुन ७२ तुकडे डीप फ्रीजरमध्ये ठेवले...श्रद्धाच्या हत्येनंतर अनुपमा गुलाटी जखमा ताज्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder Case

Shraddha Murder Case : पत्नीची हत्या करुन ७२ तुकडे डीप फ्रीजरमध्ये ठेवले...श्रद्धाच्या हत्येनंतर अनुपमा गुलाटी जखमा ताज्या

वसईतल्या एका तरुणीची निघृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात टाकल्याची भीषण घटना सध्या चर्चेत आहे. श्रद्धा वालेकर असं या तरुणीचं नाव असून ती आफताब नावाच्या तिच्याच प्रियकराने तिचा खून केला आहे. अशीच घटना काही वर्षापूर्वीही घडली होती. श्रद्धा वालेकर हत्याप्रकरण पाहता डेहराडूनमधील प्रसिद्ध अनुपमा गुलाटी हत्या प्रकरणाची आठवण सर्वांना आली आहे. ( Shraddha Murder Case Remind Dehradun Anupama Gulati Murder husband made 72 pieces wife )

श्रद्धा वालकर या वसईतल्या २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीमध्ये निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि ते तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर तो जंगलातल्या वेगवेगळ्या भागांत हे तुकडे फेकून देत होता.

अशीच घटना १२ वर्षापूर्वीही घडली होती. २०१० मध्ये डेहराडूनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर राजेश गुलाटीने पत्नी अनुपमाची हत्या केली होती. तिच्या शरिराचे ७२ तुकडे तुकडे करण्यात आले. त्यानंतर राजेशने आपल्या पत्नीचे तुकडे डीप फ्रीचमध्ये ठेवले होते. अनुपमाचा मृतदेह कापण्यासाठी इलेक्ट्रिक करवतीचा वापर करण्यात आला होता.

हेही वाचा: Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

श्रद्दाच्या हत्येनंतर १२ वर्षापूर्वीची घटना ताजी

७ ऑक्टोबर २०१० मध्ये घरी पत्नीची हत्या केल्यानंतर राजेश गुलाटीने स्टोन कटरचा वापर करत तिच्या देहाचे ७२ तुकडे केले. त्यानंतर डीप फ्रीजरमध्ये लपवले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो रोज एक तुकडा काळ्या पिशवीत टाकून घेऊन जायचा.

यानंतर तो ते तुकडे मसुरी रोडवरील जंगलात फेकत असे. आई दिल्लीला गेली असून काही दिवसांनी येईल, असे तो आपल्या दोन्ही मुलांना सांगत असे. अनुपमाचा भाऊ सिद्धांत प्रधान दून येथे आला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय 1 सप्टेंबर 2017 रोजी आला होता. राजेश गुलाटी यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पंचम विनोद कुमार यांनी शिक्षा सुनावली. सरकारी वकील बी.डी.रातुरी आणि बचाव पक्षाचे वकील उत्कर्ष हे न्यायाधीश विनोद कुमार यांच्यासमोर न्यायालयात हजर झाले.

दोन्ही बाजूंनी आपापल्या बाजूने युक्तिवाद केला. न्यायालयाने राजेश गुलाटीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील बी.डी.रातुरी यांनी सांगितले की, सध्या त्याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

टॅग्स :murder case