बेळगावातील वडगावच्या श्री मंगाई देवीच्या यात्रेला सुरवात

मिलिंद देसाई
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

बेळगाव - वडगावची ग्रामदेवता आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री मंगाई देवीच्या यात्रेला सुरवात झाली असून भक्तांच्या गर्दीने वडगाव भागातील रस्ते फुलून गेले आहेत. मंगळवारी (ता. 7) पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकानी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. 

ग्रामदेवतेची यात्रा पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरी करण्यासाठी वडगाववासीय गेल्या काही दिवसांपासून तयारी करीत होते.

शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या या मंगाई देवीला वार पाळून गाऱ्हाणे घालण्यात आले. दुपारी 12 वाजता मंगाई देवी पंच कमिटीच्यावतीने गाऱ्हाणे उतरविण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अरुण चव्हाण पाटील, शांताराम चव्हाण पाटील, शशिकांत चव्हाण पाटील, रणजित चव्हाण, अनंत चव्हाण पाटील, रत्नकांत चव्हाण पाटील, युवराज चव्हाण पाटील, योगेश चव्हाण पाटील, संदीप चव्हाण पाटील, जयराज हलगेकर  उपस्थित होते  

वडगावसह खासबाग, शहापूर, जुनेबेळगाव, अनगोळ, बेळगाव आदी भागासह आसपासच्या ग्रामीण भागातील लाखो भाविकांनी यात्रेनिमित गर्दी झाली आहे. रात्रीपर्यँत 2 लाख भाविक देवीचे दर्शन घेण्याची शक्यता आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांचे सहकारी मंदिर परिसरात कार्यरत आहेत.

Web Title: Shri Mangai Devi Yatra Vagaon Belgaum