Loksabha 2019 : श्रीपाद नाईक यांची प्रचाराला सुरवात      

Shripad Naiks campaign started for loksabha election 2019
Shripad Naiks campaign started for loksabha election 2019

पणजी : केंद्रीय आयुष राज्यमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी म्हार्दोळच्या म्हाळसा नारायणी देवीचे आशीर्वाद घेऊन आपल्या मतदारसंघात निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला. पुढील 20 दिवस ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून मतदारांच्या व इतर महत्त्वाच्या गाठीभेटी घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा गोव्यात होणार आहे, असे नाईक यांनी सांगितले. श्रीपाद नाईक यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मतदारसंघात मोठा विकास केला असून त्यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत झालेला देशाचा विकास आणि वाढलेला सामाजिक दर्जा लोकांनी अनुभवला असल्याने ते भाजपला आणखी एक संधी देण्यासाठी उत्सुक आहेत.

आगामी काळातील पंतप्रधान म्हणून लोक मोदींना मते देतील, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, विकासाच्या प्रक्रियेत गोवा मागे राहिलेला नाही. विकासकामे यापुढेही चालूच ठेवण्याचा मुद्दा या निवडणुकीत येणार आहे. 

खाणींची समस्या सोडविण्याच्या मुद्द्याला पक्षाने अग्रहक्क दिला आहे, असे नमूद करून ते म्हणाले, खाणी बंद झाल्या असल्याने लोकांचे हाल होत आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा संबंध आलेला असल्याने ही समस्या सोडविता येऊ शकलेली नाही. आम्ही पुन्हा सत्तेवर येताच हा प्रश्न अग्रक्रमाने सोडवू. संमिश्र सरकारमधील सगळे घटकपक्ष भाजपच्या उमेदवाराबरोबर असून त्याला विजयी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत, असेही ते म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com