बुटाची दोरी बांधण्याचा प्रकार; सिद्धरामय्या चर्चेत

वृत्तसंस्था
रविवार, 25 डिसेंबर 2016

म्हैसूर (कर्नाटक) : एक व्यक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बुटाची दोरी बांधत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाला याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

एक व्यक्ती सिद्धरामय्या यांच्या बुटाची दोरी बांधत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये दोरी बांधणारा व्यक्ती हा कार्यालयातील कर्मचारी नसून मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असल्याचा दावा केला आहे. यापूर्वीही जम्मू-काश्‍मिरमधील सियाचीन हा चीनचा भाग आहे, अशी पोस्ट केल्याने सिद्धरामय्या चर्चेत आले होते. सिद्धरामय्या यांच्या टीमने सियाचीनबाबत लिहिलेला  एक लेख फेसबुक आणि ट्‌विटरवर शेअर केला होता. नंतर ही टायपोग्राफिक चूक असल्याचे म्हणत संबंधित पोस्ट हटविण्यात आली होती. दरम्यान, आता नव्या प्रकारामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Siddaramaiah in fresh controversy, caught on camera getting his shoe lases tied Siddaramaiah in fresh controversy, caught on camera getting his shoe lases tied