मोदी, शहांना सिद्धरामय्यांकडून 100 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

भाजप आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांच्याविरोधात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 100 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस जारी केली.

बंगळूरू : भाजप आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांच्याविरोधात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 100 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस जारी केली. तसेच सिद्धरामय्या यांनी भाजपच्या या नेत्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणीही केली. 

amit shah

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. या प्रचारसभांदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबाबत चुकीचे आरोप करणारी आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवणारी विधाने भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आल्याचे सिद्धरामय्या यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी, अमित शहा, बी. एस. येडीयुरप्पा या नेत्यांविरोधात सिद्धरामय्या यांनी 100 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावली. तसेच या सर्वांनी सार्वजिनकपणे माफी मागण्याची मागणीही सिद्धरामय्या यांनी लावून धरली आहे. 

वकिल आणि काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य व्ही. एस. उग्राप्पा यांनी याबाबतची नोटीस जारी केली. उग्राप्पा म्हणाले, भाजपने कन्नड आणि इंग्रजी वृतपत्रे आणि वृतवाहिन्यांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून काही राजकीय जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून सिद्धरामय्या यांची अब्रुनुकसान झाली आहे. त्यामुळे या सर्व भाजप नेत्यांविरोधात 100 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस जारी केली आहे. 

Web Title: Siddaramaiah sends Rs 100 cr defamation notice to PM Modi Amit Shah