कर्नाटक निवडणुकीत ट्विटरवर चर्चा सिद्धरामय्यांचीच !

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

नेटकऱ्यांनी आपल्या टि्वटमध्ये सर्वाधिक वेळा कर्नाटकमधील ज्या नेत्यांचा उल्लेख केला आहे, त्यामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सिद्धरामय्या हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, भाजपचे मु्ख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा दुसऱ्या क्रमांकावर, जनता दल (एस)चे कुमारस्वामी तिसऱ्या क्रमांकावर, राजीव चंद्रशेखर हे चौथ्या क्रमांकावर आणि शोभा करंदाले या पाचव्या क्रमांकावर आहेत.   

बंगळूर - काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी निवडणुकांआधी कर्नाटकमध्ये बहुमताचा दावा केला होता. परंतु बहुमताच्या आकड्यापर्यंत कोणत्याही पक्षाला पोहोचता आलेले नाही. निवडणुकाच्या या कालावधीत नेटकऱ्यांनी मात्र सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षापेक्षा काँग्रेस पक्षाविषयीच जास्त चर्चा केल्याचे दिसून आले आहे. 

नेटकऱ्यांनी आपल्या ट्विटमध्ये सर्वाधिक वेळा कर्नाटकमधील ज्या नेत्यांचा उल्लेख केला आहे, त्यामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सिद्धरामय्या हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, भाजपचे मु्ख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा दुसऱ्या क्रमांकावर, जनता दल (एस)चे कुमारस्वामी तिसऱ्या क्रमांकावर, राजीव चंद्रशेखर हे चौथ्या क्रमांकावर आणि शोभा करंदाले या पाचव्या क्रमांकावर आहेत.   

25 एप्रिल ते 15 मे 2018 या कालावधीतील केलेल्या ट्विटरवरील नावांच्या उल्लेखाच्या आधारे जगभरातील निवडणुकांची माहिती देणाऱ्या ट्विटरच्या अधिकृत 'ट्विटर गव्हर्नमेंट' या अकाउंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

Web Title: siddaramaiah is trending on twitter