हॉटेल व्यवसाय धोक्‍यात येण्याची चिन्हे! 

विलास ओहाळ 
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पणजी : खाणीपाठोपाठ आता राज्यातील हॉटेल व्यवसाय धोक्‍यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात नसणाऱ्या पायाभूत सुविधा, पर्यटनाविषयीचे विपणन धोरण (मार्केटिंग स्टॅटजी) अजिबात नसल्याने पर्यटांची संख्या जवळपास 50 टक्‍क्‍यांनी घटणार आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार असल्याची भीती टॅव्हल ऍण्ट टुरिझम असोसिएशन आणि गोवा हॉटेल्स ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने व्यक्त केली आहे. 

नाताळ संपून आता सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात देश-विदेशी पर्यटक येतात. मात्र एकंदर पर्यटकांची संख्या रोढावल्याली दिसते, त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होण्याची शक्‍यता आहे. याविषयी ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष सावियो मेसिएस यांनी "गोमन्तक'ला सांगितले की, पर्यटक कमी झाले आहेत, हे खरे आहे आणि ही राज्यासाठी धोक्‍याची घंटा आहे. एकीकडे खाण व्यवसाय बंद झाला आहे. राज्याची जी अर्थव्यवस्था आहे ती पर्यटनावर चालू आहे, त्यामुळे अजूनही राज्य पर्यटनाविषयीचे विपणन धोरण चांगल्या पद्धतीने करीत नाही. येथील पर्यटकांना असणाऱ्या पायाभूत सुविधाही महत्त्वाच्या आहेत आणि त्याही आपण अद्याप तयार करू शकलो नाहीत, हे मोठे दुर्देव आहे. याशिवाय येथील हॉटेलच्या दरावर राज्य सरकारने काहीतरी उपाय योजला पाहिजे. हंगामानुसार वाढणारे हॉटेलचे दर पाहता लोक गोव्याकडे पाठ फिरवतात.

गोवा हॉटेल्स ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गौरीश धोंड यांचेही मेसिएस यांच्यासारखेच मत आहे. त्यांनीही सरकारच्या एकूण धोरणाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. मागील काही दिवसांपूर्वी उपसभापती मायकल लोबो यांनीही चार्टर विमानांची घटलेल्या संख्येवरून चिंता व्यक्त केली होती.

Web Title: sign to coming hotel business in danger