लॉकडाउनमुळे या शहरात रस्ते अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट

पीटीआय
रविवार, 28 जून 2020

लॉकडाउनमुळे गौतम बुद्धनगर शहरात रस्ते अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण घटल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. या काळात विविध दुर्घटनांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

नोइडा - लॉकडाउनमुळे गौतम बुद्धनगर शहरात रस्ते अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण घटल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. या काळात विविध दुर्घटनांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. नोएडा पोलिसांकडे एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३७ अपघाताची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील अपघाताची संख्या पाच पट अधिक म्हणजेच १९२ होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एप्रिल महिन्यात १३ रस्ते अपघातांची नोंद झाली. त्यात पाच जण मृत्युमुखी पडले, तर सतरा जण जखमी झाले. त्याचबरोबर मे महिन्यात २४ अपघातांची नोंद पोलिसांकडे झाली. त्यात ९ जण ठार झाले, तर १६ जण जखमी झाले. वाहतूक शाखेचे पोलिस अधीक्षक एस. राजेश म्हणाले, की कोरोना संसर्गामुळे देशात लॉकडाउन असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या कमी राहिली. अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य कोणत्याही प्रकारची वाहने रस्त्यावर नव्हती.

कमीच राहिले. अपघाताचे प्रमाण कमी ठेवणे आणि मृत्यूदर कमी करणे हे वाहतूक शाखेचे ध्येय आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय केले जात असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे म्हणजे सिग्नल मोडणे, मर्यादित वेग न राखणे या कारणांमुळे वाहनचालकास ई-चलनाद्वारे दंड ठोठावण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Significant reduction in road accidents in this city due to lockdown

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: