'रजतसिंधू'ची भारतीय शोधत आहेत जात

वृत्तसंस्था
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

हैदराबाद - बॅडमिंटन कोर्टवर एकीकडे पी. व्ही. सिंधू सुवर्णपदकासाठी लढत असताना भारतातील तब्बल नऊ लाख नागरिक गुगलवर सिंधूची जात शोधण्यात व्यस्त होते. ‘जात जात नाही‘, असे म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हैदराबाद - बॅडमिंटन कोर्टवर एकीकडे पी. व्ही. सिंधू सुवर्णपदकासाठी लढत असताना भारतातील तब्बल नऊ लाख नागरिक गुगलवर सिंधूची जात शोधण्यात व्यस्त होते. ‘जात जात नाही‘, असे म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

क्रिकेटवेड्या भारतीयांना सिंधूने बॅडमिंटनचे वेड लावले, पण तिची जात येथेही अडवी आली. शुक्रवारी सायंकाळी कोट्यवधी नागरिक सिंधूचा अंतिम सामना पाहत असताना दुसरीकडे गुगलवर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून सर्वाधिकवेळा ‘PV Sindhu Caste‘ ही माहिती शोधण्यात आला आहे. गुगल इंडियाने प्रसिद्धी केलेल्या सर्च अहवालात या शब्दाचा भारतातून सर्वाधिक सर्च झाल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. सिंधूची जात शोधण्याचे प्रमाण 14 ऑगस्टनंतर वाढले.

सिंधूने जपानच्या प्रतिस्पर्धाला उपांत्य फेरीत पराभव करेपर्यंत तिच्या कामगिरीचे आणि जातीचेही भारतीयांना काही देणेघेणे नव्हते. पण, उपांत्य फेरीत पोहचल्यानंतर तिच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. अन् भारतीयांना तिच्यासोबत तिच्या जातीचाही शोध घेण्यास सुरवात केली. 

सिंधू ही हैदराबादची रहिवाशी आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांतूनच तिच्या जातीबाबत सर्वाधिक सर्च करण्यात आला आहे. तिच्या आई-वडीलांनी प्रेमविवाह केला असून, त्यांनी जातीची बंधने फारपूर्वी सोडून दिली आहेत.

Web Title: "Silver is sindhu are looking for Indian