सिंधू संस्कृतीत मांसाहारावर विशेष भर;केंब्रिज विद्यापीठातील पीएच.डी विद्यार्थिनीच्या संशोधनातील निष्कर्ष

सिंधू संस्कृतीत मांसाहारावर विशेष भर;केंब्रिज विद्यापीठातील पीएच.डी विद्यार्थिनीच्या संशोधनातील निष्कर्ष

नवी दिल्ली - सिंधू संस्कृतीत लोकांच्या आहारात मांसाचे प्रमाण अधिक होते. यात गोमांसाचा वापर सर्रास केला जात असे, असा निरीक्षण ‘जर्नल ऑफ अर्कालॉजिकल सायन्स’ या नियतकालिकात बुधवारी (ता. ९) प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनपर लेखात नोंदविले आहे. 

या लेखात सिंधू संस्कृतीमधील लोकांच्या आहाराच्या सवयींबाबत विस्तृत लिखाण केले आहे. ‘लिपिड रेसिड्यू इन पॉटरी फ्रॉम द इंडस सिव्हिलायझेशन इन नॉर्थवेस्ट इंडिया’ (वायव्य भारतात नांदणाऱ्या सिंधू संस्कृतीतील मातीच्या भांड्यांमधील स्निग्ध पदार्थांचे अंश) या शीर्षकांतर्गत अक्षयता सूर्यनारायण यांच्या नेतृत्वाखाली यासंबंधी संशोधन करण्यात आले आहे. केंब्रिज विद्यापीठात त्या करीत असलेल्या पीएच. डी.चा अभ्यास म्हणून हे संशोधन केले आहे. हरियानातील हडप्‍पा संस्कृतीमधील आढळलेल्या मातीच्या भांड्यात स्निग्ध पदार्थांच्या अंशांचा आधार या संशोधन आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चीनी मातीच्या भांड्यांचा वापर 
सिंधू संस्कृतीतील आहारात पशू उत्पादने उदाहरणार्थ डुक्कर, गाई-गुरे, म्हैस, शेळ्या व मेंढ्या यांचे मांस तसेच दुग्धोत्पादनांची रेलचेल होती, हे या अभ्यासातून पुढे आले आहे. वायव्य भारतात म्हणजे आताच्या हरियाना व उत्तर प्रदेशात इसवीसन पूर्व २६००-१९०० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या सिंधू खोऱ्यातील ग्रामीण व शहरी वस्त्यांमध्ये अशा पदार्थांचा वापर चीनी मातीच्या भांड्यांमध्ये होत असे. सिंधू संस्कृतीचा विस्तार पाकिस्तान, वायव्य व पश्‍चिम भारत आणि अफगाणिस्तानमधील काही भागांत झालेला होता.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

संशोधनातील प्रमुख मुद्दे 
-मेरठ (उत्तर प्रदेश), आलीमगीरपूर, हिस्सार (हरियाना)मधील मसूदपूर, लोहारी राघो, भिवानीमधील खनक, रोहतकच्या फरमना आदी गावांवर लक्ष केंद्रित. 
- सिंधू संस्कृतीत मोठ्या वस्त्यांचे रूपांतर शहरात करण्यात आले. 
- विविध कृषी उत्पादने आणि पिकांचाही उल्लेख. 
- हिवाळा व उन्हाळ्यात सिंधू संस्कृतीमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, डाळी अशी पिके घेत असत. तसेच वांगे, काकडी, द्राक्ष, खजूरासह भाजीपालाही पिकवत असत. 
- पशुपालनात गाई व म्हशींचा मोठ्या प्रमाणात समावेश. 
- जनावरांची जी हाडे सापडली त्यात गाई व म्हशींची हाडे ५० ते ६० टक्के होती तर १० टक्के हाडे शेळ्या व मेंढ्यांची. 
- सिंधू संस्कृतीतील आहारात गोमांसचे प्रमाण जास्त. 
- मटण व कोकरांचे मांसाचा पूरक आहारात समावेश. 
- हडप्‍पा संस्कृतीत गाईगुरे तीन-साडेतीन वर्षांची होईपर्यंत त्यांना जिवंत ठेवले जाई. 
- दुग्धोत्पादनासाठी मादींचा तर शक्तीशाली कामासाठी नर जनावरांचा वापर. 
- हरिण, ससे, पक्षी, काळवीट तसेच नदी व सागरी प्राण्यांचाही आहारात समावेश. 
- आहारात चिकनचा तुरळक वापर. 
- अरुंद दांडा असणाऱ्या व मोठ्या भांड्यात मद्य व तेल साठविले जात असे. 

अभ्यास गटात डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू 
पुणे येथील डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि प्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ प्रा. वसंत शिंदे, बनारस हिंदू विद्यापीठाचे प्रा. रवींद्र एन. सिंह त्याचप्रमाणे केंब्रिज विद्यापीठातील मिरियम क्युबस. ऑलिव्हर इ. क्रेग, कार्ल पी. हेरॉन, टॅमसिन सी. ओकॉनेल, कॅमेरॉन ए. पेट्री आदी अभ्यासक या अहवालाचे सहलेखक आहेत. 

सिंधू संस्कृतीत आहारात नियमितपणे मांस असे. शिवाय त्या काळी गोमांस व डुकराचे मांस सेवन केले जात असे, हे अक्षयताच्या अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. हे केवळ उत्खननात सापडलेल्या जनावरांच्या हाडांच्या अवशेषातून नव्हे तर स्निग्ध अंशांच्या विश्‍लेषणातून ही बाब शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाली आहे. 
प्रा. वसंत शिंदे, माजी कुलगुरू, डेक्कन कॉलेज, पुणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com