तलाकपिडितेच्या बहिणीचा हिंदुत्व स्वीकारण्याचा इशारा!

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

एका तलाकपिडित महिलेच्या बहिणीने जर बहिणीचा संसार पुन्हा सुरळित करून दिला नाही, तर हिंदुत्व स्वीकारून हिंदू मुलाशी विवाह करण्याचा इशारा मुस्लिम धर्मगुरुंना दिला आहे.

उधामसिंह नगर (उत्तर प्रदेश) - एका तलाकपिडित महिलेच्या बहिणीने जर बहिणीचा संसार पुन्हा सुरळित करून दिला नाही, तर हिंदुत्व स्वीकारून हिंदू मुलाशी विवाह करण्याचा इशारा मुस्लिम धर्मगुरुंना दिला आहे.

हिजाब परिधान केलेली एक महिलेने पोलिस स्थानकात येऊन तिची उद्विग्नता व्यक्त केली. ती म्हणाली, 'जो व्यक्ती कोणत्याही क्षणी 'तलाक, तलाक, तलाक' म्हणून आयुष्य उध्वस्त करेल अशा व्यक्तीसोबत राहण्यात काय अर्थ आहे? जर असा प्रकार वृद्धपणी झाला तर त्या महिलेने कोठे जायचे? आज मी तरुण आहे आणि मी तलाकच्या भीतीखाली माझे संपूर्ण आयुष्य का घालवू? त्यापेक्षा तीन शब्द उच्चारून माझे आयुष्य उध्वस्त न करणाऱ्या हिंदू व्यक्तीसोबत हिंदुत्व स्वीकारून मी लग्न करणे अधिक चांगले आहे.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दलही तिने समाधान व्यक्त केले. ती म्हणाली, 'मोदी देशासाठी जे काही करत आहेत ते चांगले काम आहे. विशेषत: ते महिलांसाठी जे काही करत आहेत ते फारच चांगले काम आहे.'

तोंडी तलाकबद्दल चर्चा व्हायला हवी, असे वक्तव्य अलिकडेच मोदी यांनी केले आहे. तर 'तोंडी तलाक'च्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया आदित्यनाथ यांनी व्यक्त केली होती. याचबरोबर, तोंडी तलाकच्या मुद्यासंदर्भात मौन पाळणारेही दोषीच असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली होती.

Web Title: Sister of triple talaq victim threatens to adopt hinduism