विचारवंतांच्या हत्येसाठी देशी पिस्तूल?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

बेळगाव - महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अलीकडेच हिंदू संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करुन त्यांच्याकडून तीन देशी पिस्तुलांसह बाँब व इतर स्फोटके जप्त केली आहेत. त्या पिस्तुलांच्या बॅलेस्टिक चाचणी अहवालाची प्रतीक्षा गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीला आहे.

बेळगाव - महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अलीकडेच हिंदू संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करुन त्यांच्याकडून तीन देशी पिस्तुलांसह बाँब व इतर स्फोटके जप्त केली आहेत. त्या पिस्तुलांच्या बॅलेस्टिक चाचणी अहवालाची प्रतीक्षा गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीला आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील पुरोगामी विचारवंतांच्या हत्येसाठी ही पिस्तुले वापरली असावीत, असा संशय एसआयटीला आहे.

महाराष्ट्र एटीएसने वैभव राऊत (वय ४०), शरद कसलकर (वय २५) आणि सुधन्वा गोंधळेकर (वय ३९) यांना काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली होती. त्यांच्याकडून कमी तीव्रतेचे बाँब आणि देशी बनावटीची पिस्तुले जप्त केली होती. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित मास्टरमाईंड अमोल काळे याच्याशी या तिघांचा जवळचा संबध असल्याचे तपासात पुढे आले आहे. दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या ठिकाणी आढळून आलेल्या पुंगळ्या व जप्त केलेल्या पिस्तुलांचे धागे जुळत आहेत. 

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येसाठी एक पिस्तूल तर कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हस्तेसाठी दुसरे पिस्तूल वापरले आहे. एटीएसने जप्त केलेल्या १६ पिस्तुलांमध्ये हत्येसाठी वापरलेल्या दोन पिस्तुलांचाही समावेश असेल, अशी शक्‍यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. तसेच १६ पिस्तुलांव्यतरिक्‍त एटीएस अधिकाऱ्यांनी पिस्तुलीचे काही सुटे भागही जप्त केले आहेत. त्यांचीसुध्दा बॅलेस्टिक चाचणी केली जात आहे. कारण, हत्येनंतर शस्त्रे नष्ट करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे कर्नाटक एसआयटीला निष्कर्षाप्रत येण्यासाठी पिस्तुलांच्या बॅलेस्टिक चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.

सुदर्शन चक्र
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांनी हत्येसाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्राचे नाव सुदर्शन चक्र असे ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाच्या हाती असलेले सुदर्शन चक्र लक्ष्यवेधानंतर पुन्हा मूळ जागी परतत होते, ही त्यामागची धारणा होती. देशी बनावटीची पिस्तुले मारेकऱ्यांना सहज उपलब्ध होत असल्याने एसआयटीने त्यादिशेने तपास चालविला आहे.

Web Title: SIT investigation special