'सोनिया गांधींची एसआयटीमार्फत चौकशी करा'

वृत्तसंस्था
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी हिंसाचारप्रकरणी न्यायालयाने मंगळवारी दोषींना फाशीची व जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी याप्रकरणी काँग्रेस, गांधी कुटुंबीय आणि पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे. शीख विरोधी दंगलीप्रकरणी सोनिया गांधींच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) नियुक्तीची मागणी त्यांनी केली आहे.

चंदीगढ- 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी हिंसाचारप्रकरणी न्यायालयाने मंगळवारी दोषींना फाशीची व जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी याप्रकरणी काँग्रेस, गांधी कुटुंबीय आणि पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे. शीख विरोधी दंगलीप्रकरणी सोनिया गांधींच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) नियुक्तीची मागणी त्यांनी केली आहे.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या निवासस्थानी दंगलीचा कट रचला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यावेळी राजीव गांधींची सत्ता होती. इतकेच नव्हे तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना लाय डिटेक्टर चाचणी देण्यास सांगावे, असेही बादल यांनी म्हटले आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर दंगल पीडितांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी शीख विरोधी दंगलप्रकरणी एसआयटीच्या कामाचे कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही कौतुक केले आहे.

Web Title: SIT Should Summon Sonia Gandhi As The Conspiracy 1984 Anti Sikh Riots Demand By Sukhbir Badal