रावणाने नाही तर रामाने केले सीतेचे अपहरण ; बारावीच्या पुस्तकातील चूक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

गुजरातमधील बारावीच्या संस्कृत विषयाच्या पाठ्यपुस्तकात ही चूक झाली आहे. 'इंट्रेडक्शन टू संस्कृत लिटरेचर' या पुस्तकातील 106 क्रमांकाच्या पानावर ही चूक आहे.

अहमदाबाद : रावणाने सीतेचे अपहरण केल्याचे सर्वश्रोत आहे. मात्र, सीतेचे अपहरण रावणाने नाही, तर रामाने केल्याचा अजब धडा गुजरातमधील बारावीच्या पुस्तकात देण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुस्तकातील चूक ही चुकीच्या भाषांतरामुळे झाली आहे, असे स्पष्टीकरण दिले. 

गुजरातमधील बारावीच्या संस्कृत विषयाच्या पाठ्यपुस्तकात ही चूक झाली आहे. 'इंट्रेडक्शन टू संस्कृत लिटरेचर' या पुस्तकातील 106 क्रमांकाच्या पानावर ही चूक आहे. यामध्ये राम चरित्राचे वर्णन करताना सीतेच्या अपहरणाबद्दल लिहिण्यात आले आहे. पण तेथे रावणाच्या जागी राम हा शब्द लिहिण्यात आला आहे. त्यामुळे रामाने सीतेचे अपहरण केले होते, असे यामध्ये लिहिण्यात आले आहे. गुजराती माध्यमाच्या पुस्तकात ही चूक नसून, ही चूक बारावीच्या संस्कृतच्या पुस्तकात असल्याचे सांगण्यात येत आहे.

text book india

दरम्यान, ''ही चूक भाषांतरामुळे झाली असल्याने रावणाच्या जागी राम लिहिण्यात आले आहे. मात्र, गुजराती माध्यमाच्या पुस्तकात ही चूक नाही'', असे स्पष्टीकरण 'गुजरात स्टेट बोर्ड ऑफ स्कूल टेक्स्टबुक्स'चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितिन पेठानी यांनी दिले.

Web Title: Sita Abducted By Ram In Gujarat Textbook Sanskrit Subject