सीतेचा जन्म 'टेस्ट ट्यूब बेबी'मधूनः दिनेश शर्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

नवी दिल्लीः प्रभू रामचंद्र यांची पत्नी सीता यांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमधून झाला आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केला आहे. पत्रकारितेची सुरवात महाभारत काळापासून झाल्याचे शर्मा यांनी कालच (गुरुवारी) एका कार्यक्रमात म्हटले होते.

नवी दिल्लीः प्रभू रामचंद्र यांची पत्नी सीता यांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमधून झाला आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केला आहे. पत्रकारितेची सुरवात महाभारत काळापासून झाल्याचे शर्मा यांनी कालच (गुरुवारी) एका कार्यक्रमात म्हटले होते.

आधुनिक काळातील संशोधनाला आणि शोधाला प्राचीन भारताशी जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांत आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचाही समावेश झाला आहे. शर्मा म्हणाले, 'रामायण काळामध्ये सीता या जमिनीतून बाहेर आल्या होत्या. म्हणजेच त्यावेळी असलेली टेक्नॉलॉजी ही टेस्ट ट्यूब बेबी प्रमाणे होती. म्हणजे सीता यांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमधून झाला आहे.'

सीता यांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमधून झाल्याचा शर्मा यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हॉयरल झाला असून, नेटिझन्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया नोंदवत आहेत, ट्विटरवर रामायण नावाने ट्रेण्ड तयार झाला आहे.

तत्पूर्वी, पत्रकारितेची सुरवात महाभारत काळापासून झाल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी गुरुवारी (ता. 31) एका कार्यक्रमात म्हटले होते. हिंदी पत्रकारिता दिवसनिमित्त आयोजित कार्यक्रमात शर्मा बोलत होते. पुराणातील कथांचा संदर्भ देत शर्मा म्हणाले, की संजय यांनी हस्तिनापूर येथे बसूनच धृतराष्ट्र यांना महाभारताचा "आँखो देखा हाल' सांगितला होता. हे थेट प्रक्षेपण नाही तर काय आहे? एवढेच नाही तर शर्मा यांनी नारदाची तुलना गुगलशी केली. ते म्हणाले, की गुगलची आता कोठे सुरवात झाली आहे. मात्र आपले गुगल अगोदरच प्राचीन काळापासूनच सुरू झालेले आहे. नारदमुनी हे ज्ञानाचे भांडार होते. तीनदा नारायण म्हणताच ते कोठेही पोचत असत आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश देत असत.

Web Title: Sita Was Test Tube Baby says dinesh sharma