esakal | दिल्ली, केरळची स्थिती चिंताजनक
sakal

बोलून बातमी शोधा

नवी दिल्ली: नागरिकांची कोविड चाचणी करताना आरोग्य कर्मचारी.

कोरोनाच्या साथीचा प्रभाव देशभरात ओसरत आहे. गेल्या २४ तासांतील नव्या रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी असणे हे त्याचे द्योतक आहे. तब्बल १५ आठवड्यांनी (१०५ दिवस) नव्या संक्रमितांची संख्या ३८,३१० होती. यापूर्वी २२ जुलै रोजी कोरोना रुग्णांची संख्या ३७,७२४ होती.

दिल्ली, केरळची स्थिती चिंताजनक

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

देशातील इतर भागातील कोरोनाचा प्रभाव ओसरायला सुरुवात
नवी दिल्ली - कोरोनाच्या साथीचा प्रभाव देशभरात ओसरत आहे. गेल्या २४ तासांतील नव्या रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी असणे हे त्याचे द्योतक आहे. तब्बल १५ आठवड्यांनी (१०५ दिवस) नव्या संक्रमितांची संख्या ३८,३१० होती. यापूर्वी २२ जुलै रोजी कोरोना रुग्णांची संख्या ३७,७२४ होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा ७६ लाख ३ हजार १२१ वर पोचला आहे. त्याच वेळी दिल्ली व केरळसह ५ राज्यांत (महाराष्ट्र नव्हे) हिवाळ्याच्या सुरुवातीलाच कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा वाढत चाललेला कल चिंताजनक असल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्य केले. मास्क, हात स्वच्छ धुणे व सॅनिटायजरचा वापर या त्रिसूत्रीचे सक्तीने पालन यापुढेही सतत करण्याचा सल्लाही नागरिकांना दिला. 

Bihar Election- बिहारमध्ये सायंकाळी पाचपर्यंत 51 टक्के मतदान

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण व आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी आज सांगितले की, देशभरातील दोन हजार प्रयोगशाळांमध्ये ११ कोटी १७ लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत. रूग्ण बरे होण्याचे ९२ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. प्रती एक लाख लोकसंख्येमागे नव्या रुग्णांचा आकडा ५,९९१ पर्यंत खाली आला आहे. भारताचा साप्ताहिक सकारात्मकता दर ४.४ टक्के तर दैनिक सकारात्मकता दर ३.७ टक्के आहे.

मागच्या आठवडाभरापासून नव्या रुग्णसंख्येत मोठी घसरण पाहायला मिळाली. टेस्ट, ट्रॅक, ट्रेस आणि ट्रिटमेंट या ४ ‘टी’ चा सातत्याने पाठपुरावा केल्याने ८ महिन्यांनी भारतात कोरोनाचा प्रभाव कमी कमी होऊ लागला आहे.

Edited By - Prashant Patil