डिसेंबरअखेरीस परिस्थिती सुधारेलः जेटली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नवी दिल्लीः नव्या नोटा उपलब्ध करून दिल्या जात असल्यामुळे तीस डिसेंबरपर्यंत देशातील चलनी नोटांचा तुटवडा संपुष्टात येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. 

मात्र, पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या नव्या नोटांच्या स्वरुपात दाखल होणारे चलन आणि आठ नोव्हेंबरपूर्वीचे एकूण उपलब्ध चलन समप्रमाणात नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'पेपर करन्सीचे प्रमाण नक्कीच कमी असेल आणि हे साहजिकच आहे,' असे जेटली यांनी सांगितले. आठ नोव्हेंबरनंतर देशभरात कॅशलेस व्यवहाराला गती येत असल्याचा संदर्भ त्यांच्या विधानामागे होते. 

'नोटाबंदीनंतर व्यवहारांमध्ये नक्कीच व्यत्यय आला आहे. मात्र, हा व्यत्यय फारकाळ टिकणारा नाही. येत्या तीन महिन्यांत त्याचे काही परिणाम तरी दिसू लागतील. काळ्या पैशाला रोखण्यासाठी नोटाबंदी हा नवीन नियम भारत आणतो आहे. याच देशामध्ये गेली सात दशके काळा पैसा हाच नियम होता,' अशी टीकाही जेटली यांनी केली. 

नोटाबंदीनंतर राजकीय अर्थपुरवठ्यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सध्या प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाची करासाठी तीनवेळा छाननी होते. येत्या काळात ही प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि एकाचवेळी छाननी होईल. आपण एका बदलातून जात आहोत. हा बदल म्हणजे करदाते विरुद्ध काळेपैसेवाले यांच्यातील लढाई आहे.

Web Title: Situation will normal at the end of December: Jailtely