बस कोसळून प.बंगालमध्ये सहा ठार 

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

पश्‍चिम बंगालच्या पश्‍चिम मिदनापूरमध्ये वेगाने जाणारी बस कोसळल्याने आज झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले, तर अन्य 20 जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. याच जिल्ह्यातील सिल्डा येथील एका मेळाव्याला भेट देण्यासाठी हे 50 आदिवासी पिराकाटा येथून चालले होते.

मिदनापूर (पश्‍चिम बंगाल): पश्‍चिम बंगालच्या पश्‍चिम मिदनापूरमध्ये वेगाने जाणारी बस कोसळल्याने आज झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले, तर अन्य 20 जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. याच जिल्ह्यातील सिल्डा येथील एका मेळाव्याला भेट देण्यासाठी हे 50 आदिवासी पिराकाटा येथून चालले होते.

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने जितकाजवळ हा अपघात झाला. त्यामध्ये सहा जण ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले. अपघातातील जखमींना मिदनापूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 

Web Title: Six killed in West Bengal road accident