आंध्र प्रदेश : सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत ६ माओवादी ठार!

गस्तीवर असलेल्या जवानांवर केला होता गोळीबार
File Photo
File PhotoFile Phto

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यात बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत ६ माओवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. आंध्र प्रदेश पोलिसांच्या एलिट ग्रेहाऊंड्स टीमसोबत प्रतिबंधीत संघटना भाकपाच्या (माओवादी) सदस्यांशी चकमक झाली. आंध्रच्या डीजीपी कार्यालयानं याबाबत माहिती दिली. मारल्या गेलेल्या या माओवाद्यांमध्ये एक वरीष्ठ नेता आणि एका महिला सदस्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Six Maoists killed in encounter with police in Andhra Pradesh)

File Photo
विद्यार्थ्यांच्या जामिनाविरोधात दिल्ली पोलीस सुप्रीम कोर्टात

डीजीपी कार्यालयाच्या निवेदनानुसार, माम्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तिगलमिट्टा जंगल क्षेत्रात बुधवारी पहाटे भाकपा (माओवादी) आणि राज्याच्या नक्षलविरोधी बल (ग्रेहाउंड्स) यांच्यामध्ये जोरदार चकमक झाली. प्राथमिक माहितीनुसार, या चकमकीत ठार झालेल्या सहा माओवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्याचबरोबर घटनास्थळावरुन एक AK-47, एक SLR, एक कार्बाईन, तीन 303 रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आलं. दरम्यान, या भागात सध्या शोधमोहिम अद्याप सुरु आहे.

जवान गस्तीवर असताना झाली चकमक

माध्यमातील वृत्तांनुसार, पोलिसांना पुट्टापाका भागात माओवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाली होती. यानंतर नक्षलविरोधी बल ग्रेहाउंड आणि विशेष दलांचे जवान या भागात गस्तीवर असताना त्यांच्यावर माओवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देताना जवानांनी केलेल्या गोळीबारात ६ माओवादी ठार झाले. ठार झालेले माओवादी पिपुल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीचे (PLGA) सदस्य होते. या संघटनेचे जास्तीत जास्त सदस्य छत्तीसगडशी संबंधीत आहेत.

File Photo
एक लाख फ्रंटलाईन वर्कर्ससाठी 'कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स'

दरम्यान, याच वर्षी एप्रिल महिन्यात छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षारक्षक आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या एन्काउंटरमध्ये अनेक जवान मारले गेले होते. यावेळी कोब्रा जवान राकेश्वरसिंह मनहास यांना माओवाद्यांनी बंदी बनवलं होतं. कालांतरानं सोडून दिलं होतं. यामध्ये चार माओवादीही ठार झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com