विमानात सहा महिन्याच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज (ता.25) सकाळच्या सुमारास दिल्लीला येणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानामध्ये या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पोलिस उपायुक्त संजय भाटिया यांनी दिली आहे.

नवी दिल्ली : पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज (ता.25) सकाळच्या सुमारास दिल्लीला येणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानामध्ये या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पोलिस उपायुक्त संजय भाटिया यांनी दिली आहे.

बाळावर उपचार करण्यासाठी त्याचे पालक त्याला विमानाने दिल्लीला घेऊन येत होते. या बाळाला हृदयासंदर्भात आजार असल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला दिल्लीत आणले जात होते. मात्र विमानमध्ये अचानक या बाळाचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Six Month Old Baby Died On Board A Patna Delhi Spicejet Flight