सहा महिन्यांच्या बालिकेचा बलात्कार करून खून

वृत्तसंस्था
रविवार, 22 एप्रिल 2018

मध्य प्रदेशातील इंदौर येथील दुर्दैवी घटना

इंदौर: येथील एका इमारतीच्या तळघरात सहा महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह आढळून आला. या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी आरोपी सुनील भिल (वय 21) याचा पोलिस शोध घेत आहेत.

मध्य प्रदेशातील इंदौर येथील दुर्दैवी घटना

इंदौर: येथील एका इमारतीच्या तळघरात सहा महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह आढळून आला. या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी आरोपी सुनील भिल (वय 21) याचा पोलिस शोध घेत आहेत.

एका इमारतीमधून अवघ्या सहा महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे की, मृत्युमुखी पडलेल्या बालिकेच्या शरीरावर आणि गुप्तांगांवर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आला असावा, अशी शक्‍यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर बालिकेच्या पालकांना ओळखणाऱ्या सुनील यानेच तिचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले.

येथील राजवाडा किल्ल्यासमोर पालकांजवळ झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालिकेचे आरोपीने पहाटे अपहरण केले. आरोपी बालिकेला जवळच्याच इमारतीच्या तळघरात घेऊन जात असल्याचे दिसून येते. त्यानंतर तो एकटाच तळघरातून बाहेर येताना दिसतो आहे.

आरोपीला लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक एच. सी. मिश्रा यांनी दिली. आरोपी आणि बालिकेचे वडील फुगे विकण्याचा व्यवसाय करतात.

आसामात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
आसाममधील तीनसुकिया जिल्ह्यात एका 55 वर्षांच्या व्यक्तीने अवघ्या सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित मुलीच्या घराच्या शेजारीच आरोपी राहतो. काही दिवसांपूर्वी त्याने मुलीला घरी बोलावून घेत तिच्यावर बलात्कार केला. याबाबतची माहिती पीडित मुलीच्या आईने शुक्रवारी आपल्या पतीला दिल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Six month old daughter raped and murder