सहा महिन्यांत 11 जवानांना हौतात्म्य 

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

गेल्या सहा महिन्यांत सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या 11 जवानांना हौतात्म्य आले आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या असल्याचे सांगितले जात आहे. 
 

नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांत सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या 11 जवानांना हौतात्म्य आले आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या असल्याचे सांगितले जात आहे. 

जानेवारी 2018 पासून आतापर्यंत शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 320 घटना घडल्या आहेत. त्यात सीमा सुरक्षा दलाचे 11 जवान हुतात्मा झाले, तर 37 जवान जखमी झाले आहेत. गेल्या वर्षात गोळीबाराच्या 111 घटना घडल्या आहेत, तर 2016 मध्ये 204, तर 2015 मध्ये 350 आणि 2014 मध्ये 127 घटना घडल्या आहेत. 2016 मध्ये बीएसएफचे दोन जवान हुतात्मा, तर 7 जण जखमी झाले होते. 2016 मध्ये बीएसएफचा बीएसएफचे तीन जवान हुतात्मा, तर 10 जण जखमी झाले आहेत. 2015 मध्ये बीएसएफचा एक जवान हुतात्मा, तर 5 जण जखमी झाले होते. 
 

Web Title: In six months, 11 soldiers will be given martyrdom