झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांनी केली आत्महत्या

वृत्तसंस्था
रविवार, 15 जुलै 2018

हजारीबाग जिल्ह्यात हे सर्वजण राहत होते. यातील पाच जणांनी गळफास घेऊन तर एकाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. महावीर माहेश्वरी (70), किरण माहेश्वरी (65), नरेश अग्रवाल (40), प्रिती अग्रवाल (37), यमन (11), यान्वी (6) या सहा जणांनी एकाचवेळी आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी तीन सुसाईड नोट मिळाल्या आहेत.

हजारीबाग : झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सहा जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. कर्जबाजारीपणाला कंटाळून या कुटुंबीयाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबतची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे.  

हजारीबाग जिल्ह्यात हे सर्वजण राहत होते. यातील पाच जणांनी गळफास घेऊन तर एकाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. महावीर माहेश्वरी (70), किरण माहेश्वरी (65), नरेश अग्रवाल (40), प्रिती अग्रवाल (37), यमन (11), यान्वी (6) या सहा जणांनी एकाचवेळी आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी तीन सुसाईड नोट मिळाल्या आहेत.

महावीर माहेश्वरी यांचे ड्रायफ्रूट्ची दुकाने असून, गेल्या काही दिवसांपासून मार्केटमधून 50 लाख ते एक कोटींपर्यंत पैसे येणे बाकी होते. मात्र, ते पैसे येत नसल्याने माहेश्वरी निराश होते. या नैराश्य आणि कर्जबारीपणामुळे या सर्वांनी आपली जीवनयात्रा संपवली.

Web Title: Six people of a family in Jharkhand committed suicide