दाट धुक्‍यामुळे झालेल्या अपघातात सहा जण मृत्युमुखी

पीटीआय
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

चंडीगड - दाट धुक्‍यामुळे कामगारांना घेऊन जाणारी व्हॅन पुढील ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात सहा कामगार मृत्युमुखी पडले, तर अन्य 13 जण जखमी झाले. ही घटना हरियानाच्या सावंतखेरा गावात घडली.

हरियानाच्या सिसरा जिल्ह्यात कापूस वेचण्यासाठी हे कामगार पंजाबहून आले होते. हे सर्व जण व्हॅनमधून जात होते. दाट धुक्‍यामुळे येथील दृश्‍यमानता कमी झाल्यामुळे सिरसा-दबवली रस्त्यावर या दोन्ही वाहनांची धडक झाली, अशी माहिती दबवालीचे पोलिस उपअधीक्षक सत्यपाल यांनी दिली.

ते म्हणाले, की या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. त्याचप्रमाणे चार जण गंभीररीत्या जखमी झाले.

Web Title: Six people were killed in a road accident in dense fog