आसाममधील चकमकीत 6 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016

दिफू (आसाम) - आसाममधील अंगलोंग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. या चकमकीत एक लष्कराचा जवान जखमी झाला आहे. 

दिफू (आसाम) - आसाममधील अंगलोंग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. या चकमकीत एक लष्कराचा जवान जखमी झाला आहे. 

दहशतवाद्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि लष्करांनी बनीपाथपूर येथे केलेल्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान ही चकमक झाली. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई झाली. शोधमोहिम सुरू असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केली. यानंतर झालेल्या चकमकीत कार्बी पिपल्स लिबरेशन टायगर्सचे (केपीएलटी) किमान सहा दहशवादी ठार झाले आहे. त्यामध्ये दहशवाद्यांच्या दोन नेत्यांचाही समावेश आहे. याबाबत पोलिस अधिक्षक देबोजीत देऊरी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत माहिती दिली. तर या कारवाईत लष्कराचा एक जवान जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Six terrorists killed in Assam